लसीसाठी दोन गटात हाणामारी; आरोग्य कर्मचारी फरार Saam Tv
देश विदेश

लसीसाठी दोन गटात हाणामारी; आरोग्य कर्मचारी फरार

गर्दी, झुंबड न करता लसीकरण करण्याचे आदेश देण्यात येतात. परंतु बिहारमध्ये मात्र भलतंच काही घडलं आहे. बिहारमध्ये लसींसाठी दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे.

वृत्तसंस्था

बिहार : देशात मोठ्या प्रमाणात कोरोना Corona लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. तरी शांततेत लसीकरण करणे सुरू आहे. गर्दी, झुंबड न करता लसीकरण करण्याचे आदेश देण्यात येतात. परंतु बिहारमध्ये Bihar मात्र भलतंच काही घडलं आहे. बिहारमध्ये लसींसाठी दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांनी एकमेकांना चक्क दगड मारण्यास सुरू केल. मात्र या सर्व गोंधळात आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव वाचवून पळून गेले.

हे देखील पहा-

बिहार राज्यात सीतामढी जिल्ह्यातील भटोलिया या गावात एका शाळेत कोरोना लस देणे सुरु होते. तेव्हा आधी लस कोण घेणार यावरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतरण भयंकर हाणामारीत झाले. या हाणामारीच्या वेळेस लोकांनी एकमेकांना दगड फेकून मारले. लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी कसाबसा आपला जीव वाचवून पळून गेले.

घटनास्थळी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. पुन्हा लसीकरण सुरू झाले. सध्या या लसीकरण केंद्रावर पुन्हा काही घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT