High Court Saam Tv
देश विदेश

Calcutta High Court: कैदी महिला गरोदर होतायत; पुरुषांना तुरुंगात प्रवेश नको; मुख्य न्यायाधीशांकडे विनंती

High Court: पश्चिम बंगालमधील महिला तुरुंगातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, कारागृहातील महिला गरोदर होत असल्याने महिलांच्या कारागृहातील तैनात असलेल्या पुरुष अधिकाऱ्यांना महिलांच्या विभागात प्रवेश देऊ नये अशी विनंती करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Female Prisoners Getting Pregnant :

पश्चिम बंगालमधील तुरुंगातून एका धक्कादायक बातमी समोर आलीय. राज्यातील सर्व सुधारगृहाचे न्याय मित्र ( एमिकस क्युरी ) यांनी कोलकाता उच्च न्यायायलयात एक अहवाल सादर केलाय. यात महिला तुरुंगातील एक धक्कादायक बाब उजेडात आणलीय. पश्चिम बंगालमधील महिला कारागृहातील महिला कैदी गरोदर होऊ लागल्या आहेत. कारागृहात असताना महिला गरोदर हो असून त्यामुळे राज्यातील कारागृहामध्ये १९६ मुलांचा जन्म झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.(Latest News)

आज कोलकाता उच्च न्यायालयात एमिकस क्युरीने याप्रकरणी एक अहवाल सादर केला. हा अहवाल मुख्य न्यायाधीश टीएस शिवगणनम आणि न्यायाधीश सुप्रतिम भट्टाचार्यच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता. एमिकस क्यूरी यांनी आपल्या नोटमधील तिसरा परिच्छेद वाचताना म्हणाले की, मीलॉर्ड तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु कारागृहात असलेल्या कैदी महिला गरोदर होत आहेत. त्यामुळे तुरुंगात मुलांचा जन्म होत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या विविध तुरुंगात १९६ मुलांचा जन्म झाला आहे. नोट वाचताना एमिकस क्युरी यांनी मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केलीय की, सुधारगृहातील तैनात असलेले पुरुष कर्मचाऱ्यांचा महिला कैद्यांच्या विभागात प्रवेश देणं बंद करावं. “अलीकडेच मी सुधारगृहांचे महानिरीक्षक (विशेष) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांसह महिला सुधारगृहाला भेट दिली. तेथे मला आढळले की एक गर्भवती महिला आणि इतर किमान १५ महिला कैदी त्यांच्या मुलांसोबत राहत आहेत. त्या मुलांचा जन्म तुरुंगातच झाला असल्याचं एमिकस क्यूरी यांनी सांगितलं.

यानंतर मुख्य न्यायाधीस टीएस शिवगणनम आणि न्यायाधीश सुप्रतिम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. दरम्यान एमिकस क्युरी हे तुरुंगातील स्थिती सांगत होते, त्यावेळी सरकारी वकील देखील तेथे होते. दरम्यान एमिकस क्यूरी यांनी सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख करताना खंडपीठ म्हणाले की, क्यूरी यांनी जाहीर केलेला अहवाल हा गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत आहे. "कारागृहात असताना महिला कैदी गर्भवती होत आहेत आणि सध्या १९६ मुले पश्चिम बंगालच्या विविध कारागृहात राहत आहेत."

पश्चिम बंगाल सुधारक सेवांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, सहा वर्षांखालील मूल असलेल्या महिलेला अटक झाल्यास तिच्या मुलाला आईसोबत तुरुंगात राहण्याची परवानगी दिली जाते. “सहा वर्षांखालील मुलांना तुरुंगात त्यांच्या आईसोबत राहण्याची परवानगी आहे. पण तुरुंगात महिला गर्भवती झाल्याची मला माहिती नाही. पण हे असणं होणं शक्य नाही. माझ्या निदर्शनास आल्यास मी त्याकडे नक्कीच लक्ष देईन."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? मग फक्त एकदाच करा तयारी; आठवडाभर नाश्त्याची चिंता मिटेल

Pahadi Masala Chai Recipe : पावसाळ्यात बनवा फक्कड पहाडी मसाला चहा, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

Pune Tourism : पावसाळ्यात धबधबा पाहण्याचा आनंद काही औरच! पुण्यात लपलाय 'हा' निसर्गाचा अद्भुत चमत्कार

SCROLL FOR NEXT