Farmer Protest  X
देश विदेश

Farmer Protest 2024 : अश्रूधुराच्या नळकांड्याला मिरची पावडरने प्रत्युत्तर; खनौरी सीमेवर शेतकरी आक्रमक, १२ पोलीस गंभीर जखमी

Farmer Protest update in marathi : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश नवीन पद्धत अवलंबली आहे.

Vishal Gangurde

Farmer Protest Update :

पंजाब-हरियाणाच्या खनौरी सीमेवर शेतकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री सुरु आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. (Latest Marathi News)

पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चारा आणला आहे. शेतकरी चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावत आहेत. शेतकऱ्यांनी चाऱ्याला आग लावल्यानंतर सर्वत्र धूर पसरत आहे. या धूराचा त्रास पोलिसांना होताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवर रोखलं आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यामुळे घटनास्थळी सर्वत्र धूर पसरत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून खनौरी सीमेवर चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेराव घातला. यामुळे शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक केली.

चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावल्यामुळे १२ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सुख्या चाऱ्यात मिरची पावडर टाकून आग लावल्याने परिसरात विषारी धूर पसरत आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा गुरुवारी दिल्लीकडे कूच होणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता शुक्रवारी सांयकाळी शेतकऱ्यांकडून नवी रणनीती आखली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आंदोलनाची पुढील दिशा कशी असणार, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT