Anju On PM Modi Saam Tv
देश विदेश

Anju On PM Modi: पाकिस्तानातही PM मोदींचे चाहते, त्यांनाही असा नेता हवा; अंजूने सांगितली लोकांची इच्छा

Anju Return in India: या वर्षी जूनमध्ये राजस्थानमधील भिवाडी येथून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजू तिच्या फेसबुक प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती.

Satish Kengar

Anju On PM Modi:

या वर्षी जूनमध्ये राजस्थानमधील भिवाडी येथून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजू तिच्या फेसबुक प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. भारतात आल्यापासून तिच्या अनेक मुलाखती समोर आल्या आहेत.

अंजूने तिच्या ताज्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. अंजू म्हणाली की, पंतप्रधान मोदींची पाकिस्तानमध्ये मोठी क्रेझ आहे. लोकांना ते खूप आवडतात. अंजूने सांगितले की, पाकिस्तानचे लोक भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या मुलाखतीत अंजू म्हणाली, "पाकिस्तानमधील लोक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत. पाकिस्तानच्या लोकांनाही मोदींसारख्या नेत्याची गरज आहे, जो देशाला पुढे नेऊ शकेल." यादरम्यान अंजूने असेही सांगितले की, ती तिच्या पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाहला लवकरच भारतात बोलवणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अंजू जुलैमध्ये तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. अंजू पाकिस्तानी नागरिक नसरुल्ला (२९) याला भेटण्यासाठी वैध व्हिसावर आदिवासी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीर ​​जिल्ह्यात गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची फेसबुकवर ओळख झाली. अंजूने तिथे नसरुल्लाशी लग्न केले आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवले.

अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला आणि ती राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहायला होती. अंजू नसरुल्लाहच्या प्रेमात आपली दोन मुले आणि पती अरविंदला न सांगता घरी सोडून प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आणि तिथे तिने नसरुल्लाशी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT