Modi Government ANI
देश विदेश

Modi Government : मोदी सरकार खात्यात टाकणार 34 हजार? केंद्र सरकारकडून मिळणार बोनस?

Fact Check : मोदी सरकारच्या नव्या योजनेतून तुम्हाला 34 हजार रुपये मिळणार आहेत असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच अशी कोणती योजना आहे का...? पैसे कसे मिळणार...? काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

मोदी सरकार आता तुमच्या खात्यात 34 हजार रुपये टाकणार असा दावा करण्यात आलाय...हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय...सरकार अचानक 34 हजार रुपये खात्यात का टाकणार आहेत...? सगळ्यांनाच पैसे मिळणार आहेत की यासाठी काही नोंदणी करावी लागणार आहे...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज - केंद्र सरकार तुमच्या बँक अकाऊंटमध्ये फ्रीमध्ये 34 हजार रुपये टाकणार आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने सरकारशी संपर्क साधला...खरंच आता 34 हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत का...? याबाबत विचारणा केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

- केंद्र सरकारची 34 हजार देण्याची योजना नाही

- पैसे देण्याबाबत सरकारने कोणतीही घोषणा केली नाही

- खोट्या माहितीच्या आधारे कोणतीही लिंक उघडू नका

- खोटी माहिती देऊन गरजूंना गंडवण्याचा डाव

खोटी माहिती व्हायरल केली जातेय...कारण, पैशांचा विषय आला की सगळेजण काळजीपूर्वक पाहतात...आणि मेसेजसोबत आलेली लिंक उघडून पाहतात...त्यामुळे असे मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका...तसेच कोणतेही डॉक्यूमेंट जमा करू नका...कारण, खोटी आमिषं दाखवून लुटण्याचा हा प्लान असू शकतो...त्यामुळे आमच्या पडताळणीत मोदी सरकार खात्यात 34 हजार रुपये टाकणार असल्याचा दावा असत्य ठरणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT