Istanbul  saam tv
देश विदेश

Video : तुर्कस्तानची राजधानी स्फोटाने हादरली, ४ जणांचा मृत्यू; भयानक Video आला समोर

तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल शहर रविवारी भीषण स्फोटाने हादरलं आहे.

Vishal Gangurde

Istanbul News : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल शहर रविवारी भीषण स्फोटाने हादरलं आहे. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण स्फोटात चार जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Latest Marathi News)

तुर्कस्तानच्या माध्यमांच्या माहितीनुसार, इस्तंबूल शहरातील गर्दीच्या ठिकाणी रविवारी हा बॉम्बस्फोट झाला. सदर बॉम्बस्फोट हा सायंकाळी चार वाजताच्या (१३०० जीएमटी) दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सदर बॉम्बस्फोटाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्यानंतर अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे लोकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले. लोक जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळताना दिसत आहे.

दरम्यान, इस्तंबूल शहरात ज्या ठिकाणी हा स्फोट झाला. त्या ठिकाणी अनेक दुकाने आणि रेस्ट्रो आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी पर्यटक आणि स्थानिक मोठ्या प्रमाणात येत असते. सदर स्फोटामध्ये कमीत कमी ११ लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कस्तानमध्ये २०१५ ते २०१७ सालच्या दरम्यान अनेक स्फोट झाले आहेत. सदर स्फोटांचे कनेक्शन इस्लामिक स्टेट आणि कुर्दिश समुहाशी जोडलं जातं. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. सदर व्हिडिओ पर्यटकांनी (Tourist) बनवले आहेत. या भीषण स्फोटामुळे काही ठिकाणी आग लागल्याची देखील घटना घडली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT