Thailand Firecracker Factory Blast Saam TV
देश विदेश

Firecracker Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Thailand Factory Blast: थायलंडमधील फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (१७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला

Satish Daud

Thailand Firecracker Factory Blast

थायलंडमधील सुफान बुरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (१७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्यातील अनेक भागात भीषण आग लागली होती. आग विझवताना अग्निशमन दलाला मोठे परिश्रम घ्यावे लागले. अद्यापही आग धुमसत असून बचावपथकाला अडथळे येत आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून मृतदेह शोधण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. सध्या बचावपथकाकडून युद्धपातळीवर मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बँकॉकपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपाहान प्रांतात घडली. हा किनारी भाग असून येथे फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत. यातील बहुतांश कारखाने जुने आहेत. (Latest Marathi News)

हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने आजूबाजूच्या भागातील लोक या कारखान्यांमध्ये काम करतात. बुधवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात अनेक मजूर काम करीत होते. त्याचवेळी कारखान्यात अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की क्षणार्धात परिसरात धुराचे मोठ-मोठे लोळ पसरले होते. या घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT