Finance Budget 2022 Updates Saam Tv
देश विदेश

Finance Budget 2022 Updates: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये उत्साह; सेंसेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

Finance Budget 2022 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या संसदेत वार्षिक अर्थसंकल्प २०२२-२३ (Union Budget 2022) मांडत आहेत. यावेळी त्यांनी भारतात डिजिटल करन्सीसंदर्भात (Digital Currency) मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे. डिजिटल करन्सी तयार करण्याची जबाबदारी रिजर्व बॅंकेकडे (RBI) देण्यात आली असून या घोषणेनंतर शेअर बाजारात (Share Market) उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं. या घोषणेनंतर शेअर बाजाराने मोठी असळी घेत सेंसेक्स (Sensex) तब्बल ९०० अंकांनी वाढला आहे. (Enthusiasm in the stock market after the announcement of digital currency; Sensex jumps 900 points)

हे देखील पहा -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची (Rupee) घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात आरबीआय लवकरच रुपी नावाचं चलन घोषीत करु शकते. यामुळे भारतात डिजिटल करन्सीला सुगीचे दिवस येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT