Power transition uncertainty rises in Iran following the end of Ayatollah Khamenei’s decades-long rule. Saam Tv
देश विदेश

इराणमध्ये 37 वर्षांची खामेनींची राजवट संपुष्टात, मोजताबा आता खामेनींचा वारसदार

Khamenei Rule Ends Iran Power Struggle Successor Analysis: इराणमधील खामेनींची 37 वर्षांची राजवट संपुष्टात आलीय... खामेनींच्या मृत्यूमुळे अमेरिकेनं इराणमध्ये सत्तास्थापनेसाठी कसे प्रयत्न सुरु केलेत... आणि खामेनींचा पुढचा वारसदार नेमकं कोण आहे...

Saam Tv

इराणचे शहा असलेल्या मोहम्मद रझा पहलवी यांच्याविरोधात 1979 साली इस्लामी क्रांती झाली. त्यानंतर तत्कालीन धर्मगुरू रुहोल्लाह खोमेनी यांनी इराणवर वर्चस्व प्रस्थापित केली... रुहोल्लाह यांच्या निधनानंतर 1989 पासून अयातुल्लाह खामेनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले... तब्बल 36 वर्ष अयातुल्लाह खामेनीं यांनी इराणचे सर्वोच्च नेते राहिले... कोण आहेत खामेनी ते पाहूयात,...

कोण होते खामेनी?

- इराणमधील दुसरे सर्वात शक्तिशाली नेते

- 1981मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड

- 1989 पासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान

- शाह राजवटीविरुद्ध प्रदीर्घ काळ संघर्ष

- इस्लामिक क्रांतीनंतर देशाचे प्रमुख म्हणून निवड

- लष्कराचे प्रमुख आणि कमांडर-इन-चीफ

दरम्यान, इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्याच्या मागे खोमेनी यांची सत्ता उलथवून लावणे हाच उद्देश्य असल्याचं बोललं जातयं.. अमेरिकेने सातत्याने इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध केलाय.. तर इस्त्रायलनेही अमेरिकेच्या सूरात सूर मिसळत इराण हा अण्वस्त्र संपन्न झाल्यास आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप केला होता. त्यानंतर इस्त्रायल-अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत खोमेनींचा खात्मा झालाय. खामेनींना दोन चार मुलं आहेत. मात्र ते हयात असतानाच त्यांनी आपल्या दुसऱा मुलगा मोजताबा याला वारसदार म्हणून नेमलं होतं. त्यांची मुलं नेमकी कोण आहेत ते पाहूयात......

खामेनींची 4 मुलं

आता वारसदार मोजताबा

मोस्तफा खामेनी

मोज्ताबा खामेनी

मसूद खामेनी

मेसम खामेनी

आता अयातोल्ला खामेनी गेल्यानंतर मोजताबा खामेनी अमेरिकेला कसं आणि कधीपर्यंत तोंड देणार हा खरा मुद्दा आहे. तर दुसरीकडे शहा मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र रझा पहलवी यांनी अमेरिकेतून सातत्याने खामेनीं राजवटीविरोधात आवाज उठविला होता. त्यांच्या मृत्यूनंतर रझा पहलवी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानलेत... त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्रिन्स रझा पहलवी यांच्या माध्यमातून अमेरिका इराणवर सत्ता मिळवू पाहतेय... या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये रझा पहलवी यांची सत्ता येणार की खामेनींचे वारसदार इस्त्रायल-अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT