Emergency in Pakistan Saam TV
देश विदेश

Emergency in Pakistan : इम्रान खान यांच्या अटक नाट्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, आणीबाणी लागण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता, मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर विचारमंथन सुरू

Satish Kengar

Imran Khan Arrest : इम्रान खान यांना अटक झाल्यापासून पाकिस्तानात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला कट्टर इम्रान समर्थक आणि दुसऱ्या बाजूला लष्कर आणि सरकार असं चित्र सध्या पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे.

गुरुवारी पाक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रानच्या सुटकेनंतरही परिस्थिती सामान्य झालेली नाही. शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे, असं पाकिस्तानच्या जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, देशात सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.  (Breaking Marathi News)

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानमधील भारतीय वृत्तवाहिनी WION शी बोलताना हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू शकते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले, "परिस्थिती अशीच राहिली तर आणीबाणी हा घटनात्मक पर्याय असू शकतो. पण देशात मार्शल लॉ लागू होण्याची शक्यता नाही."

Emergency in Pakistan : पंतप्रधान शाहबाज शरीफ करू शकतात आणीबाणीची घोषणा

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने देशात तातडीने आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यासंदर्भात घोषणा करू शकतात.

Emergency in Pakistan : पाकिस्तानमध्ये चौथ्या दिवशी इंटरनेट, सोशल मीडिया बंद

 इम्रान खान यांच्या अटकेनंतर 9 मे पासून देशभरात सुरू असलेल्या हिंसक निषेधाच्या पार्श्वभूमीवर ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबसह इंटरनेट सेवा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चौथ्या दिवशीही पाकिस्तानमध्ये बंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT