Elephant Vs Tiger Video Viral/Social Media SAAM TV
देश विदेश

Viral : हत्ती जंगलात शांतपणे उभा होता, वाघ शिकार करणार तोच... पाहा थरारक VIDEO

Elephant Vs Tiger Video Viral : वाघ आणि हत्तीच्या लढाईचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

Tiger Vs Elephant Viral Video: सिंह, चित्ता आणि वाघ हे जंगलातले खतरनाक प्राणी. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच ते शिकार करतात. पण हे प्राणी जरी 'जंगल के शेर' असले तरी, असे काही प्राणी आहेत, की त्यांच्या वाट्याला जाणं हिंस्र प्राण्यांना महागात पडतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओनुसार, एक हत्ती अगदी शांत उभा आहे. त्याची शिकार करण्याच्या इराद्यानं वाघ त्याच्याकडे धावतो. पण अचानक बाजी उलटली. गजराजने पुढच्या काही क्षणांत या वाघाला धडा शिकवला. (Viral Video)

जंगलात (Forest) शांतपणे उभ्या असलेल्या हत्तीच्या शिकारीसाठी वाघ चाल करून येतो, असे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. हा वाघ हत्तीच्या जवळ आला. आपलं सावज टप्प्यात आलंय असं वाघाला वाटू लागतं. हत्तीवर हल्ला करण्याचाच विचार जणू तो करतोय असं वाटतंय. पण याची चाहूल हत्तीला लागली अन् वाघ हल्ला करणार तोच काही क्षणांत हत्तीनं त्याच्यावर पलटवार केला.

हत्तीचं रौद्ररूप बघून वाघानं धूम ठोकली. आता बाजी पूर्णपणे उलटली होती. हत्तीच वाघाचा पाठलाग करू लागला होता.

हत्ती आणि वाघाच्या लढाईचा थरार बघा या व्हिडिओतून..

जंगलाचा राजा असलेल्या वाघाला हत्तीसारख्या प्राण्यांशी पंगा घेणं महागात पडतं, असं या व्हिडिओतून बघायला मिळतं. जर वाघ हत्तीच्या तावडीत सापडला असता तर, काय घडलं असतं, याची कल्पनाच न केलेली बरी. हा व्हिडिओ एका पर्सनल ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ४७ सेकंदाचा हा कमाल-धमाल आणि तितकाच थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT