eknath shinde supporters mla, dance, goa, cm maharashtra saam tv
देश विदेश

गाेव्यात जल्लाेष; एकनाथ-लोकनाथ गाण्यावर थिरकले आमदार (व्हिडिओ पाहा)

भाजपने सेनेचा मुख्यमंत्री केल्याने एकनाथ शिंदे गट आनंदित झाला. आम्ही घेतलेला निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी आणि आमच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी कटिबद्ध आहे असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

गाेवा : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) मुंबईत आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री (chief minister) हे एकनाथ शिंदे (eknath shinde) असतील अशी घोषणा करताच शिंदे गटाच्या आमदारांनी गोव्यातील (Goa) हॉटेलमध्ये एकच जल्लोष करीत नृत्य केले. (eknath shinde latest marathi news)

शिंदे गटाच्या आमदारांचा नृत्य करताना व्हिडिओ देखील माध्यमांपर्यंत पाेहचला. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींचा वेग आणखी वाढला. एकनाथ शिंदे हे गाेव्यातून मुंबईत थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे पाेहचले.

त्यानंतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे आणि फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील. ते एकटेच शपथ घेतील अशी घाेषणा केली. ही घाेषणा हाेताच गाेव्यात वास्तव्यास असलेला एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांनी हाॅटेलातच नृत्य करु आनंदाेत्सव साजरा केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

SCROLL FOR NEXT