Eggs will now carry expiry and lay dates under new government rules to ensure food safety and transparency for consumers. Saam Tv
देश विदेश

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

Eggs to Carry Expiry Date: अंडी खाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे... यापुढे अंड्यावर एक्सपायरी डेट लिहून येणार आहे... मात्र हा नियम का लागू करण्यात आलाय... अंड्यावरची एक्सपायरी डेट कशी महत्त्वाची ठरणार आहे... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

तुम्ही जर अंड खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..कारण तुम्ही खात असलेल्या अंडयाची एक्सपायरी डेट उलटून गेलीय असं तुम्हाला सांगितलं तर... होय तुम्ही खात असलेल्या अंड्यांवर आता एक्स्पायरी डेट लिहून येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं व्यापारी-शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. एकीकडे, आधीच इराण-अमेरिका युद्धामुळं 1 कोटी अंड्यांची निर्यात बंद झाली असतानाच दुसरीकडे सरकारनं यासंदर्भात नवे नियम जाहीर केलेत.

ग्राहकांना खराब अंडी विकण्यापासून रोखण्यासाठी नियमावली

प्रत्येक अंड्यांवर ले डेट आणि एक्सपायरी डेट बंधनकारक

नियम मोडणाऱ्या दुकानदारांचा माल जप्त होणार

या नव्या नियमांची अंमलबजावणी 01 एप्रिलपासून होणार आहे. उत्तर प्रदेशात कोणत्याही दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला तारीख नसलेली अंडी विकता येणार नाहीयेत. मुदतीची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे अंडे किती जुने आणि ते खाण्यासाठी योग्य आहे का, हे ग्राहकांना स्वतः तपासून घेता येणारेय. मात्र, असं जरी असलं तरी सर्वसामान्यपणे अंडे किती काळ टिकतात पाहूयात...

तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमानात म्हणजेच 30 अंश सेल्सियसमध्ये अंडी केवळ 2 आठवड्यांपर्यंत चांगली राहू शकतात. तर 02 ते 08 अंश सेल्सियस तापमानात म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवल्यास महिन्याभरापर्यंत अंडी टिकू शकतात.आतापर्यंत आपण औषधं, बिस्किटं किंवा दुधाच्या पिशवीवर किंवा आणखी काही खाण्याच्या पदार्थांवर एक्सपायरी डेट बघायचो. पण आता उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना पहिल्यांदाच चक्क अंड्यांवर एक्स्पायरी डेट पाहायला मिळणारेय. खरं तर 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं म्हटलं जातं. कारण भरपूर प्रोटीन म्हणजेच प्रथिने असलेले अंड खाणे प्रकृतीसाठी चांगलं मानलं जातं. मात्र आता खरेदी केलेल्या अंड्यावरची पहिली तारीख बघा आणि मग खूशाल खा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT