ED Cases Against Political Party Leaders Latest Update SAAM TV
देश विदेश

ED Probe On TMC Leader: घरातील पुरावे नष्ट करण्यासाठी जमावाला हल्ल्यासाठी चिथावणी दिली; टीएमसी नेत्यावर ईडीचा आरोप

TMC Leader Sahajahn Shaikh: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टीएमसी नेता शाहजहान शेखवर ईडीच्या टीमवर हल्ला करण्यासाठी गर्दी भडकावल्याचा आरोप केलाय. त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून हे पाऊल उचलल्याचं इडीनं म्हटलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sahajahn Shaikh Multi Crore Ration Distribution Case :

अंमलबजावणी संचालनालयानं (ED) टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्यावर एजन्सी टीमवर हल्ला करण्यासाठी जमावाला भडकवल्याचा आरोप केलाय. जेणेकरून तो त्याच्या निवासस्थानातील पुरावे नष्ट करू शकेल आणि पळून जाईल, असं ईडीनं म्हटलंय.

जेव्हा शुक्रवारी ईडीची टीम उत्तर 24-परगणा जिल्ह्यातील सरबेरिया गावात पोहोचली. तेव्हा शेख स्वत: घरात उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरात बंद केलं, असा दावा ईडीनं केलाय.

मनी लाँड्रिंग प्रकरण

बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांचे शेख साथीदार आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं ईडीनं सांगितलं. पीडीएस घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहे. शेख यांच्या मोबाईल लोकेशनवरून घरात असल्याचं सूचित झाल्याचं ईडीनं सांगितलं. (latest news)

जमावानं ईडी अधिकार्‍यांचे वैयक्तिक आणि अधिकृत सामान जसं की मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम, पाकीट देखील हिसकावून घेतलं, असं ईडीनं सांगितलं.

आरोपीवर कोणकोणते आरोप :

अनेक सहकारी संस्थांसोबत शेतकऱ्यांची नावे असलेली 'बनावट' कागदपत्रे वापरून धान्य खरेदीच्या घोटाळ्यातही शेखचा सहभाग असल्याच्या आरोपाखाली त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी मल्लिकसाठी काम करत होते. पीडीएस घोटाळ्यात त्यांचा सहभाग होता.

ED बेकायदेशीर धान्य खरेदी आणि PDS घोटाळ्यांसह शेख आणि मल्लिक यांच्यासह आरोपीकडे असलेल्या 100 हून अधिक मालमत्तांची चौकशी करत आहे. शेख मल्लिकच्या वतीने अनेक डमी कंपन्या चालवत होते. त्याची चौकशी करण्यासाठी आणि पुरावे मिळविण्याच्या हेतुनं त्यांच्या निवासस्थानीची झडती घेतली होती. संदेशखळी येथे ईडी अधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्यानंतर शेख शाहजहान विरुद्ध लुक आउट परिपत्रक (एलओसी) जारी करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT