Members of East Turkistan National Movement mark memorial day while renewing calls for independence from China. saam tv
देश विदेश

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

China East Turkistan : पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय चळवळीने चीनपासून स्वातंत्र्याची मागणी केी आहे, आता पुन्हा एकदा या मागणीने जोर धरला आहे. या संघटनेने चीनवर कब्जा आणि दडपशाहीचा आरोप केला आहे.

Bharat Jadhav

  • ईस्ट तुर्किस्तानकडून पुन्हा स्वातंत्र्याची मागणी

  • ईटीएनएमने ऐतिहासिक दिवसानिमित्त आंदोलनाला बळ

  • चीनकडून सर्व आरोपांचा इन्कार

पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय चळवळीने (ETNM) नुकताच पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय सैन्य स्मृती दिनाचा ८१ वा वर्धापन दिन साजरा केला. याप्रसंगी संघटनेने स्व-शासनासाठीच्या प्रदेशाच्या ऐतिहासिक प्रयत्नांचे आणि राष्ट्रीय अस्मिता जपण्याच्या संघर्षाचे स्मरण करत चीनपासून स्वातंत्र्य हवे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमध्ये, संघटनेने म्हटले की, पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय सैन्याची स्थापना पूर्व तुर्कस्तान प्रजासत्ताकाने १९४५ साली केली होती. या सैन्याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि स्वातंत्र्य टिकवणे हा होता.

चीनने आमच्या प्रदेशावर कब्जा केला

दरम्यान संघटनेनुसार २२ डिसेंबर १९४९ रोजी चीनने पूर्व तुर्कस्तान प्रजासत्ताक बरखास्त केले. राष्ट्रीय सैन्य विसर्जित केले आणि त्यानंतर त्या प्रदेशावर वसाहतवादी कब्जा सुरू केला. ETNM आरोप केला आहे की राष्ट्रीय सैन्याच्या विघटनामुळे स्थानिक लोक असुरक्षित झाले आहेत. आणि चीनने या प्रदेशात वंशसंहारक आणि दडपशाहीची धोरणे अवलंबली आहेत.

आपल्या निवेदनात ईस्ट तुर्कस्तान नॅशनल मूव्हमेंटने म्हटलं की, आम्ही आमच्या पूर्वजांचा हुतात्म्यांचा आणि ईस्ट तुर्कस्तान राष्ट्रीय सैन्यात सेवा केलेल्या सर्व सैनिकांचा सन्मान करतो. चीनचा ताबा, दडपशाही आणि वंशसंहार संपवून पूर्व तुर्कस्तानला मुक्त करण्याच्या आमच्या निर्धाराचा आम्ही पुनरुच्चार करतो.

पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय?

पूर्व तुर्कस्तान राष्ट्रीय चळवळ ही चीनच्या शिनजियांग प्रदेशातील उइघुर आणि इतर तुर्की समुदायांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळींचे प्रतिनिधित्व करते. जे संपूर्ण स्वातंत्र्य किंवा अधिक स्वायत्ततेची मागणी करत आहेत. शिंजियांग हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रदेश आहे. येते मोठ्या संख्येने उइघुर मुस्लिम समुदाय आणि इतर तुर्की वंशीय गट राहतात. हे समुदाय आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जपण्यासाठी अधिक हक्कांची मागणी करत आहेत. यामुळे वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी जोरदार मागणी केली आहे.

चीनने हे सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. बीजिंगची अधिकृत भूमिका अशी आहे की, शिनजियांग हा चीनचा अविभाज्य भाग आहे. तेथील त्यांची धोरणे अतिरेकी घटकांना रोखण्यासाठी व प्रदेशात स्थिरता राखण्यासाठी आहेत. चीनने या प्रदेशातील मानवाधिकार उल्लंघनाचे सर्व दावे निराधार म्हणत फेटाळून लावले आहेत. दरम्यान शिंजियांग हा दीर्घकाळापासून वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. उइघुर आणि इतर तुर्की गट चीनवर सांस्कृतिक दमन, धार्मिक निर्बंध आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT