Nepal Earthquake News AI Image
देश विदेश

Earthquake : गाढ झोपेत असताना जमीन हादरली, घाबरून नागरिक घराबाहेर धावले, ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Nepal Earthquake Update News : नेपाळमध्ये आज पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी ४.९ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. जमिनीखाली ७३ किलोमीटर खोल केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Alisha Khedekar

  • नेपाळमध्ये आज पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली.

  • भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी मोजण्यात आली.

  • भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ७३ किलोमीटर खोल असल्याची माहिती

जगभरात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे भूकंपाच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

आज पहाटेच्या सुमारास नेपाळमधील काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार झटके बसले. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पहाटेची वेळ असल्याने अनेक लोक झोपेत होते. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भूकंपाची अधिकृत माहिती दिली आहे.

केंद्राने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती शेअर केली. त्यानुसार, आज सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी नेपाळमध्ये भूकंपाची नोंद करण्यात आली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ७३ किलोमीटर खोल असल्याची माहिती समोर आली आहे.

नेपाळ हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भागांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या भागात वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. नेपाळमध्ये यापूर्वीही मोठ्या भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. दरम्यान, या भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले, तसेच कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laundry Tips : कपडे धुताना एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागला? घाबरू नका, महागड्या ड्रायक्लीनिंगची गरज नाही; वापरा 'ही' सोपी ट्रिक

Ramayana Collection : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाने तिकिट खिडकीवर मारली बाजी, ७ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींची बंपर कमाई

Maharashtra News Live Update: पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेची CBI आणि ED मार्फत चौकशी होणार

Mumbai Crime: मुंबई हादरली! १० जणांकडून नवरा-बायको अन् मुलीवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् काठ्यांनी मारहाण

Rain Alert : धो धो पाऊस कोसळणार! १५ राज्यांना पावसाचा इशारा; ताशी ७० च्या वेगाने वारे वाहणार

SCROLL FOR NEXT