Earthquake
Earthquake Saam Tv
देश विदेश

Earthquake In Pakistan : भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरलं; परिसरातील नागरिक भयभीत

Vishal Gangurde

Earthquake In Pakistan : पाकिस्तानमधील इस्लामाबाद भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये रविवारी दुपारी १:२४ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. या भूकंपात अद्याप किती नुकसान झालं आहे, याची माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake) झटके जाणवले होते. त्यानंतर आज रविवारी पाकिस्तानात भूकंप धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के इस्लामाबादसहित अनेक शहरात जाणवले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराच्या बाहेर पडून सैरावैरा पळू लागले.

पाकिस्तानात या आधी १७ जून रोजी पाकिस्तानात भूकंप आला होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुल्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचबरोबर फैसलाबाद, एबटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 इराण भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला; सात जणांना मृत्यू

इराण आज, रविवारी भूकंपाच्या तीव्र झटक्याने हादरला.तुर्की-इराण सीमेजवळील वायव्य इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोय शहराला शनिवारी रात्री ५.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे इराणच्या प्रांतीय राजधानीत अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

इराणी मीडिया आणि युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) यांनी याबाबत माहिती दिली आहे. इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 440 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT