Japan Saam Tv
देश विदेश

Japan Earthquake : जपानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; होक्काइडोमधील नागरिक भयभीत

या परिसरात पुढील आठ दिवस अशाच भूकंपाची शक्यता वर्तवली आहे.

Ruchika Jadhav

Japan Earthquake : जपानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील होक्कइडो या ठिकाणी काल शनिवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. जपानच्या हवामान विभागाने आणि अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये होक्काइडोमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी असल्याचं म्हटलं आहे. (Latest Japan Earthquake News)

होक्काइडोपासून दूर असलेल्या कुशीरो आणि तटीया या शहरांमध्ये देखील या भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

पुढील आठवड महत्वाचा

जपानच्या स्थानिक माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार, रात्री १०.२७ मिनिटांनी शहरात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. ४३ किलोमीटर खोल अंतरावर हा भूकंप झाला. या परिसरात पुढील आठ दिवस अशाच भूकंपाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जपानमध्ये भूकंप होणे ही एक साधी गोष्ट आहे. या ठिकाणी नेहमीच भूकंप होत असतात. त्यामुळेच येथील इमारतींचे बांधकाम अतिशय कठीण आणि मजबूतीने केले जाते. इमारत मजबूत असल्याने ६.१ तीव्रतेपेक्षाही अधिक तीव्रतेचा भूकंप सहन करू शकते. २० फेब्रुवारी रोजी देखील या ठिकाणी भूकंपाचे झटके जाणवले होते. मात्र याची तीव्रता ५.३ इतकीच होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Express : कांदा एक्स्प्रेस लासलगाव येथे रोखली, VIDEO

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, MPSCच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना अटक

Maharashtra News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Jui Gadkari: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विमान प्रवासात मोठा अनर्थ टळला; 'ती' पोस्ट शेअर करताच चाहत्यांची चिंता वाढली

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, रक्षाबंधनाआधीच सरकारकडून ओवाळणी; ₹1500 खात्यात जमा

SCROLL FOR NEXT