देश विदेश

Turkey Earthquake Update : तुर्कस्तान भूकंपाच्या 7.8 रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरला, 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

भूकंपानंतर अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Earthquake in Turkey : तुर्कस्तान आज भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला आहे. नूर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली.

मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली आहे. भूकंपानंतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि लोक बचावासाठी रस्त्यांवर आले होते.

तुर्कस्तानातील भूकंपाचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तुर्कीमध्ये आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सीरियात जीव गमावलेल्यांचा आकडा 90 वर पोहोचल्याची माहिती आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपामुळे अनेक जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

भूकंप झाल्यास काय कराल?

>> सर्वात आधी भूकंप झाल्यास अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवावं आणि घाबरू नये.

>> तात्काळ आजूबाजूला असलेल्या एखाद्या टेबलाखाली बसावं. आपलं डोकं त्याखाली झाकलं जाईल अशा स्थितीत बसावं.

>> जोपर्यंत भूकंपाचे धक्के बसणे थांबत नाहीत, तोपर्यंत टेबलाखालीच राहावे

>> भूकंपाचे हादरे थांबल्यानंतर तात्काळ घर किंवा ऑफिस किंवा खोलीबाहेर पडावे.

>> घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर निघताना लिफ्टचा वापर करू नये. बाहेर आल्यानंतर झाड, भिंत किंवा खांबापासून दूर राहावे

>> भूंकपावेळी वाहनामध्ये असल्यास तात्काळ ते थांबवावे. धक्के थांबत नाहीत तोपर्यंत आतमध्येच बसून राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

बाळाचे जावळ काढण्याचं योग्य वय काय? का केली जाते ही विधी?

राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

SCROLL FOR NEXT