Earthquake SAAM TV
देश विदेश

Earthquake in J&K : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का; 24 तासांत सहाव्यांदा हादरला परिसर

Jammu Kashmir News : सुदैवाने भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

साम टिव्ही ब्युरो

J&K Earthquike News : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे सहा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. तर जम्मू-काश्मीरमध्ये अवघ्या 11 मिनिटांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. (National News)

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी 2.30 वाजता पहिला भूकंप झाला, ज्याची तीव्रता 3 रिश्टर स्केल होती. लेहमध्ये रात्री 9.44 च्या सुमारास भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तिसरा हादरा जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता बसला. त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल होती. (Latest Marathi News)

ईशान्येकडील लेहमध्ये भूकंपाचा चौथा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 4.1 असल्याचे सांगण्यात आले. तर आज म्हणजे रविवारी पहाटे 3.50 वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पाचवा हादरा जाणवला, ज्याची तीव्रता पुन्हा 4.1 रिश्टर स्केल होती. रविवारी सकाळी 8.28 वाजता सहावा भूकंपाचा धक्का बसला. लेहच्या ईशान्येला 279 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती.

आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता, असं हवामान विभागाने सांगितलं. भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर होती. यादरम्यान काही घरांना भेगा पडल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT