China Pakistan Earthquake News Saam TV
देश विदेश

Earthquake News: पाकिस्तानसह चीनमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; भल्यापहाटे जमीन हादरली, लोक पळतच सुटले

Pakistan Earthquake News: भारतातील शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

Satish Daud

China Pakistan Earthquake News

भारतातील शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने घरातील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक दचकून उठले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेकजण घराबाहेर पडले होते. यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे पापुआ न्यू गिनीमध्येही मंगळवारी पहाटे सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप झाला. न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर झालेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक घरांना तडे गेल्याची माहिती आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पाकिस्तानमध्ये आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. घरांना हादरले बसल्याने भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक घराबाहेर पडले.

लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. दुसरीकडे चीनला देखील भूकंपाचा हादरा जाणवला आहे. चीनच्या जिजांगमध्ये ५.०.रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

भूकंप झाल्यास काय करावे?

  • जर तुम्ही इमारतीच्या आत असाल, तर जमिनीवर बसा. मजबूत फर्निचर असलेल्या टेबलखाली सहारा घ्या.

  • जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर, झाडे, खांब आणि विजेच्या तारांपासून दूर जा.

  • तुम्ही वाहनात प्रवास करत असाल तर लवकरात लवकर वाहन थांबवा आणि वाहनात बसून राहा.

  • जर तुम्ही ढिगाऱ्याखाली दबले असाल तर कधीही माच लावू नका, हलवू नका किंवा काहीही ढकलू नका.

  • जर तुम्ही ढिगाऱ्याखाली गाडले असाल तर, कोणत्याही पाईप किंवा भिंतीवर हलके टॅप करा.

  • जेणेकरून बचाव कर्मचार्‍यांना तुमची परिस्थिती समजू शकेल. तुमच्या घरात आपत्ती निवारण किट नेहमी तयार ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT