दुर्दैवी : मद्यधुंद कारचालकाने दिली पोलिसांना धडक; 2 पोलिसांचा मृत्यू अनिल पाटील
देश विदेश

दुर्दैवी : मद्यधुंद कारचालकाने दिली पोलिसांना धडक; 2 पोलिसांचा मृत्यू

कोलवा पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना सेरावली येथे निवडणूक आचारसंहितेची नाकाबंदी ड्युटीवर असताना मद्यधुंद चालकच्या चारचाकी वाहनाने धडक दिली असून या धडकेत दोन्ही पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

अनिल पाटील

गोवा : दक्षिण गोव्यातल्या (Goa) कोलवा पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना सेरावली येथे निवडणूक आचारसंहितेची नाकाबंदी ड्युटीवर असताना मद्यधुंद चालकच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने शैलेश गावकर (३०) वर्षे या पोलीस कॉन्स्टेबलला जागीच ठार झाले .अत्यव्यवस्थेत असलेल्या विश्वास देयकर (३४ वर्षे ) याला बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जात असताना वाटेवरच त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात रात्री १२ .१० मिनिटाच्या वेळेवर धोलयो गॅरेजजवळ घडला आहे. यावेळी या ठिकाणी कोलवा पोलीस स्थानकांचे चार कॉन्स्टेबल ड्युटीवरती होते. रात्रीच्या वेळी कारचालक क्रेग रोड्रिग्स हा युवक आपले चारचाकी वाहन क्रमांक जे ए ०५ -दि -६४३० भरधाव वेगाने कोलवा ते मडगावच्या दिशेने येत होता. यावेळी सेरावली येथे ड्युटीवरती असलेल्या पोलीसांना धडक दिली. यामध्ये शैलेश गावकर या पोलीस कॉन्स्टेबल व विश्वास दयेकर यांना जोरदार धडक बसल्याने यामध्य़े शैलेशचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर अव्यस्थेत असलेल्या विश्वास याला बांबोळी येथील मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला.

हे देखील पहा -

दरम्यान अन्य दोन कॉन्स्टेबल दुसऱ्या बाजूने असल्याने या अपघातापासून बचावले असून या विषयी अधिक माहितीनुसार वाहन चालक क्रेग रोड्रिग्स याने अति मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे या विषयी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरु असल्याची माहिती कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. या पोलिसांना राज्य सरकारच्या वतीने तीस लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT