drunk boy viral video on social media saam tv
देश विदेश

Viral Video: 'हा लुंगी डान्स नाही, हा तर दारू डान्स',व्हायरल व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल

दारू पिणं आरोग्यासाठी घातक आहे, हे सर्वांना माहित आहे. पण...

नरेश शेंडे

दारू पिणं आरोग्यासाठी घातक आहे, हे सर्वांना माहित आहे. पण दारू पिणाऱ्याला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. त्यांना फक्त दारूच्या नशेत राहून लोकांचं मनोरंजन करायचं असतं. काही माणसं दारूच्या नशेत काय करतील, याचा नेम नाही. लग्नसोहळ्यात (Marriage ceremony) एका तरुणाने दारूच्या नशेत भन्नाट डान्स केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दारु पिण्यासाठी काय काय करावं लागतं, याचं थेट प्रक्षेपणचं या तरुणाने त्याच्या अॅक्टिंगद्वारे केलं आहे. (Drunk boy dance viral video on social media)

काही महिला ढोल ताशाच्या तालावर थिरकताना या व्हिडिओत दिसत आहेत.याचदरम्यान कॅमेरा समोर येऊन एका तुरुणानं दारुच्या नशेत भन्नाट डान्स केला. या तरुणाच्या डान्स स्टेप्स पाहून दारु पिणाऱ्यांना दारु न पिताच नशा चढणार, यात काही शंका नाही. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,एक तरुण दारु कशी प्यायची, याची रितसर प्रोसेस सांगत आहे. जरी तुम्ही व्यसनाधीन नसले, तरीही हा व्हिडिओ पाहून तु्म्ही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडिओ ansh.parashar_13 नावाच्या युजरने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक नक्कीच म्हणतील, भाईने काही न सांगताच दारू पिण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, मज्जा आली, ही असते खरी नशा...तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, मनाच्या गोष्टी सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Cheapest Plans: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

SCROLL FOR NEXT