PM Narendra Modi Saam TV/ ANI
देश विदेश

PM Narendra Modi: पारंपरिक हिमाचली टोपी, चोला-डोरा पोशाखात PM Modi नी केली केदारनाथ मंदिरात पूजा

पंतप्रधानांनी 'चोला डोरा' नावाचा पारंपारिक पहाडी पोशाख परिधान केला होता. हिमाचल प्रदेशातील चंबा येथील महिलांनी हा खास पोशाख मोदींसाठी बनवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तराखंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांनी रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पुजा केली.

मोदी आज उत्तराखंडच्या (Uttarakhand) दौऱ्यावर असून ते आज उत्तराखंडमधील विकासकामांची पाहणी करण्यासोबतच काही नवीन प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत. आजच्या दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली.

यावेळी पंतप्रधानांनी 'चोला डोरा' नावाचा पारंपारिक पहाडी पोशाख परिधान केला होता. हिमाचल प्रदेशातील चंबा येथील महिलांनी हा खास पोशाख पंतप्रधानांसाठी बनवला असून नुकत्याच झालेल्या राज्य दौऱ्यात त्यांना हा पोशाख त्यांना भेट देण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ -

केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी 9.7 किलोमीटरच्या गौरीकुंड-केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. शिवाय केदारनाथ (Kedarnath) येथे त्यांच्या अडीच तासांच्या कार्यक्रमादरम्यान मोदी आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधी स्थळालाही भेट देणार आहेत.

केदारनाथ येथील कार्यक्रमादरम्यान ते आदिगुरू शंकराचार्य (Adiguru Shankaracharya) यांच्या समाधी स्थळालाही भेट देणार आहेत. बद्रीनाथ धाम येथे ते नदीकिनारी असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेणार असून दुपारी ते रोपवे प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ-बद्रीनाथमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक तैणात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे आठ वर्षांत सहाव्यांदा केदारनाथला भेट देणार आहेत. उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर ते 23 ऑक्टोबरला अयोध्येलाही जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT