America President Oath Ceremony  ani
देश विदेश

Donald Trump Oath Ceremony: अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प पर्व'; 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

America President Oath Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे उपस्थित होते.

Bharat Jadhav

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. स्थानिक वेळेनुसार भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची (America) 35 शब्दांत शपथ घेतली. ते यावेळी म्हणाले, “मी शपथ घेतो की, मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन. यावेळी त्यांनी त्यांच्या आईने 1955 मध्ये दिलेल्या बायबलवर हात ठेवत शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांना अभिनंदन केलंय. मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमच्या ऐतिहासिक शपथविधीबद्दल अभिनंदन! दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

२० जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता पीएम मोदींनी ही पोस्ट शेअर केलीय. या पोस्टला २० मिनिटांत ५.७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. याशिवाय अनेक लोक या पोस्टवर कमेंट करून ट्रम्प यांचे अभिनंदन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरनंतर आता नांदेडमध्ये गॅसचा तुटवडा

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

Viral Video: धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद! समोरून येणाऱ्या दोन बाईकस्वारांची एकमेकांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Kalyan Murbad : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट, रेल्वे मंत्र्यांनी सांगितला सर्वात मोठा अडथळा

SCROLL FOR NEXT