Donald Trump’s controversial remark on India ignites political backlash and diplomatic debate. saam tv
देश विदेश

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

Donald Trump India Comment Row Reaction: आपणच जगाचे मालक आहोत. आपण काहीही बोललं तरी कुणी आपल्याला बोलू शकत नाहीत, अशा थाटात अमेरिकेच्या युद्धखोर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचा अपमान केलाय.. नेमकं काय म्हणालेत ट्रम्प आणि त्यांच्या वक्तव्यानंतर कसा वाद पेटलाय?

Bharat Mohalkar

एपस्टीन फाईलमुळे गोत्यात आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर युद्ध लादलं.... मात्र त्यानंतरही एपस्टीन फाईल काही पाठ सोडायला तयार नाही... त्यामुळे निवडणुकीत मायलेज मिळवण्यासाठी अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात गरळ ओकलीय... होय... डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख करुन 140 कोटी भारतीयांचा अपमान केलाय..

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला... त्यात रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने परदेशी नागरिक जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्यासाठी नवव्या महिन्यात अमेरिकेत येतात, असं वक्तव्य केलं.. हाच व्हिडीओ रिपोस्ट करत ट्रम्प यांनी एक पोस्ट लिहीलीय.. त्यात म्हटलंय की, स्थलांतरित भारत, चीनसारख्या नरक सदृश्य देशातून अमेरिकेत येतात.. इथं मुलं जन्माला घालतात...जी अमेरिकेची नागरिक होतात.. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला भारत किंवा चीनमधून बोलावून घेतात... हे पाहण्यासाठी तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही.. कारण इथं इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आजच्या काळात स्थलांतरितांमध्ये अमेरिकेबद्दल निष्ठा उरली नसल्याचं म्हटलंय.

दुसरीकडे ट्रम्प यांनी भारताचा अपमान केल्यानंतरही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं मात्र बोटचेपी भूमिका घेतल्याचं दिसतय.... त्यावरुन काँग्रेसनं परराष्ट्र मंत्रालयावर टीकेची झोड उठवलीय..

एकीकडे अमेरिका आणि भारत मैत्रीचे गोडवे गायले जात आहेत... तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताचा अपमान करत आहेत.. पॅरीस हवामान करारावरुन भारतावर केलेली टीका असो वा कोरोनाच्या आकडेवारीवर घेतलेला संशय... एवढंच नाही तर व्यापार कराराची धमकी देऊन आपण भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे अकलेचे तारे तोडले होते... आता बौद्धिक दिवाळखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त देशाचाच नाही तर देशातील 140 कोटी लोकांचा अपमान केलाय.. त्यामुळे आता तरी भारतानं ठोस भूमिका घेण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT