Donald Trump  saam Tv
देश विदेश

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा टॅरिफ जगभरातील १०० देशांत लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे.या देशामध्ये भारताचीही समावेश आहे.

Vishal Gangurde

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजीपासून अमेरिकेत १०० देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. याला अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दुजोरा दिला आहे. हा अमेरिकेच्या जागतिक व्यापार धोरणातील मोठा बदल मानला जात आहे. यामुळे भारतासहित अनेक देशांच्या वस्तूंवर आयात शुल्क लागू होणार आहे.

अमेरिकेच्या निर्णयाने १ ऑगस्टपासून जवळपास १०० देशांतून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंना १० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. स्कॉट बेसेंट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या देशांशी कसे व्यवहार करत आहे, ते आम्ही पाहत आहे. आता १०० देशांना कमीत कमी १० टक्के आयात शुल्क लागू होईल'.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांना 'घ्या किंवा सोडा' या शैलीत टॅरिफच्या तपशीलासह पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारत, जपान, युरोपातील देशांचा समावेश आहे. मात्र, ट्रम्प यांनी देशांच्या नावाचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.

या टॅरिफचा उद्देश अमेरिकेतील निर्यात वाढवणे, व्यापाराच्या अटी अमेरिकेच्या बाजूला करणे असा आहे. पण, इतक्या मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावणे आतापर्यंतच्या दशकांतील सर्वात आक्रमक व्यापार धोरण मानलं जात आहे. यामुळे जवळपास अर्ध्या जगातील देशांवर परिणाम होणार आहे.

भारतावर परिणाम होणार?

अमेरिकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढणार आहे. सध्या भारताला अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर २६% अतिरिक्त टॅरिफमुक्ती मिळाली आहे. पण ही सूट ९ जुलै २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर म्हणजे १ ऑगस्टपासून भारतातून जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावरही मोठा परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

महागड्या गोळ्या-औषधं खाणं टाळा! शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खा 'ही' ५ फळे

SCROLL FOR NEXT