Dimond Treasure On Mercury Planet saam Tv
देश विदेश

Dimond On Budh Grah: बुध ग्रहावर सापडला हिऱ्यांचा खजिना; हिरे पृथ्वीवर आणता येणार?

Dimond Treasure On Mercury Planet: पृथ्वीवर अनेक दागिन्यांसाठी राजा- महाराजांनी अनेक लढाया केल्या. आताही दागिन्यांची खाण सापडली तर मोठी कमालीचं गोष्ट मानली जाते. आता हिऱ्याची खाण सापलडली, पण ही खाण पृथ्वीतलावर नाही तर बुध ग्रहावर आहे.

Tanmay Tillu

पृथ्वीवर अनेक अशी रत्न आहेत जी मिळवण्यासाठी लढाया झाल्या. सोनं, चांदीसाठी लुटमार झाली. हिरे-मोतींसाठी तर युद्ध झालेत. याच हि-यांची मोठी खाण सापडलीय. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र हे खरंय. ही खाण मात्र पृथ्वीर नव्हे तर बुध ग्रहावर सापडलीय. केवढी मोठी ही खाण आहे आणि पृथ्वीवर हे हिरे आणता येणार का यावरचा हा विशेष रिपोर्ट.

हिरा कोहिनूर हिऱ्यापासून ते अगदी तुमच्या बोटातल्या अंगठीपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटतो तो हिरा. अगदी गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असो वा लग्नसराईत अंगठीत हिरा हा हवाच. चमकदार,पैलू पाडलेलं हे रत्न अनेकांना भुरळ घालतं. अगदी इतिहासातही एका हिऱ्यासाठी लढाया झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. भारतातील कोहिनूर हिऱ्याचा इतिहास तसा रंजकच. काही माणसं हिऱ्यासारखी असतात असं आपण उपहासानं म्हणतो आता कल्पना करा की 18 किलोमीटर अंतरावर फक्त हिरे विखुरलेले आढळले तर तुम्ही काय कराल ? तर हे खरंच घडलंय, बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखाली शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात हिरे सापडले आहेत.

हे हिरे पृथ्वीवर आणता येतील का असा सवाल उपस्थित झालायं. बुध ग्रह अनेक रहस्यांनी भरलेलाय. त्यातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं रहस्य म्हणजे बुधाचं चुंबकीय क्षेत्र.. बुधाचं चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या तुलनेत कमकुवत आहे. कारण बुध ग्रह आकारमानाने लहान असून भौगोलिकदृष्ट्या अॅक्टिव्ह नाही. त्याचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी गडद रंगाचा आहे.नासाच्या मेसेंजर मिशनने बुध ग्रहाच्या पृष्ठभागावरील गडद रंग ग्रॅफाइट असल्याचं सांगितलं होतं.

मुळात ग्रॅफाईट कार्बनचंच एक रूप आहे. नासाला शंका आहे की हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच तयार झालाय. म्हणजेच, गरम मॅग्मा वितळल्यानंतर. मात्र बुध ग्रहातील मॅग्माचा थर कार्बन आणि सिलिकेटनं समृद्ध असावा. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे सापडलेत. तोही एक पूर्णपणे घन हिरा. याचा आतील गाभा मजबूत धातूंचा असेल असाही अंदाज नासाला आहे. मात्र हे हिरे पृथ्वीवर आणता येणार नाहीत पण त्यांच्या अभ्यासातून नवीन माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

SCROLL FOR NEXT