Top terror commanders eliminated in mysterious targeted attacks across Pakistan, triggering fear within extremist networks. saam tv
देश विदेश

धुरंधर ठरतोय दहशतवाद्यांचा कर्दनकाळ',टार्गेट किलिंग'नं पाकिस्तानात खळबळ

Target Killings Shake Pakistan: पाकिस्तानच्या लियारीत दहशतवाद्यांचा खात्मा करणारा धुरंधर गुप्तहेर तुम्ही सिनेमात पाहिला असेल. मात्र, आता असेच काही धुरंधऱ कुठल्याही पुरावा मागे न ठेवता भारताच्या शत्रूंना ठेचून मारतायत. हा धुरंधर पॅटर्न नेमका काय आहे? 'टार्गेट किलिंग'नं पाकमधल्या दहशतवाद्यांना कसा घाम फुटलाय?

Saam Tv

पाकिस्तानात सध्या जे काही घडतंय, ते काही धुरंधऱ चित्रपटातील कथानकापेक्षा कमी नाहीये. पाकिस्तानात राजाश्रय भोगणाऱ्या दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा करण्यात येतोय. पाकिस्तानात आठवडयाभरात बड्या दहशतवादी टॉप कमांडर्सची हत्या करण्यात आलीये. मात्र, या हत्येचा कुठलाही सुगावा ना दहशतवादी संघटनांना होता, ना त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी सरकारला... त्यामुळे पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या 'धुरंधर पॅटर्न'नं भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलीच धडकी भरलीये.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा संशयास्पदरित्या खात्मा

20 मे 2025 ला लाहोरमध्ये जीवघेणा हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या संस्थापक अमीर हमजावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

तसंच, जून 2025 मध्ये जैशचा टॉप कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा संशयास्पद स्थितीत मृत आढळला होता.

तर 28 एप्रिलला लष्कर-ए-तोयबाचा खैबर पख्तूनख्वाह येथील प्रमुख शेख युसूफ अफ्रिदी हा अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झाला होता.

त्यानंतर आता 30 एप्रिलला बहावलपूरमध्ये एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर सलमान अजहर ठार झाला.

खरंतर, 'धुरंधर' स्टाईलने काम फत्ते करणारे हे अज्ञात हल्लेखोर येतात, अचूक वेध घेतात आणि वाऱ्याच्या वेगाने गायब होतात. आणि याचा पाकिस्तानच्या लष्कराला आणि ISI ला थांगपत्ताही लागत नाहीये. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या हत्येचं वर्णन 'टार्गेट किलिंग' असं केलंय. या टार्गेट किलिंगमध्ये ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे टॉप कमांडर होते. त्यामुळे पाकिस्तानात बसून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हाफिज सईद आणि मसूद अजहर या दहशतवाद्यांच्या संघटनेचे धाबे दणाणलेत. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या या धुरंधरला कोणाचं बळ आहे ? याचीही चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी होणार खुलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी चेक करा नवीन दर; जाणून घ्या प्रमुख शहरांतील किमती

Heart Failure: हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय? काय असतात याची सुरुवातीची लक्षणं

SCROLL FOR NEXT