stylish hand bag from rice bag  Instagram
देश विदेश

Viral News: देसी जुगाड! तरुणीने तांदळाच्या पोत्यापासून तयार केली स्टायलिश हॅण्ड बॅग, Video होतोय व्हायरल

Latest News: तांदळाच्या पोत्यापासून तयर केलेल्या स्टायलिश हॅण्ड बॅगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Priya More

Mumbai News: सोशल मीडियावर (Social Media) अनेक क्रिएटिव्ह व्हिडिओ व्हायरल होत असतात. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केलेले अनेक व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. तसं पाहायला गेले तर हे व्हिडिओ (Viral Video) सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि अनेक जण तसा प्रयोग करुन देखील पाहत असतात. अशाच प्रकारचा एक देसी जुगाडवाला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणीने चक्क तांदळाच्या पोत्यापासून स्टायलिश हॅण्ड बॅग तयार केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

काही लोकं जुगाड आणि कल्पकतेच्या जोडीने ऐवढी अप्रतिम गोष्ट तयार करतात की ते पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या लोकांना अशा आयडिया सूचतातच कशा असा प्रश्न अनेकदा असे व्हिडिओ पाहून आपल्याला पडतो. सध्या इन्स्टाग्रामवर असाच एका तरुणीचा देसी जुगाडवाला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या तरुणीने रिकाम्या तांदळाच्या पोत्यापासून सुंदर हॅण्ड बॅग तयार केली आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स जबरदस्त कमेंट्स करत तिच्या आयडियाचे कौतुक करत आहेत.

@shwetmahadik या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'जुन्या तांदळाच्या पोत्यापासून तयार केलेली अपसायकल बॅग!!' या व्हायरल इन्स्टा व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही तरुणी आधी तांदळाचे रिकामे पोते घेते. नंतर ती पर्स तयार करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने कात्रीने कापते. त्यानंतर शिलाई मशीनच्या सहाय्याने ती हे तुकडे शिवून घेते. हे सर्व भाग जोडल्यानंतर त्याला चैन लावते. त्यानंतर पिशवीच्या हँडलसाठी सोनेरी रंगाची जाड साखळी जोडते.

त्यानंतर ही तरुणी पांढऱ्या रंगाचा सुंदर स्टायलिश ड्रेस परिधान करुन तिने तयार केलेली ही स्टायलिश बॅग कॅरी करते. तिने तयार केलेली ही पर्स खूपच सुंदर दिसत आहे. तिचा लूक आणखी स्टालिश दिसत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला आतापर्यंत 48 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडओला 2 लाख 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटिझन्सने यावर कमेंट्स करत या तरुणीच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT