BJP On Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Delhi Politics : राहुल गांधींचं लग्न झालं नाही, मग त्यांच्या घरातून २४ मतं कशी? वोटिंग बूस्टिंगच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

Delhi : अरविंद केजरीवाल यांनी भाजप मंत्र्याच्या घरी मतदारांची संख्या वाढत आहे असे म्हणत वोटिंग बूस्टिंग करण्याचा आरोप केला होता. यावर राहुल गांधीचे उदाहरण देत भाजपने प्रतिप्रश्न केला आहे.

Yash Shirke

Delhi Politics News : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इंडिया आघाडीत असलेले आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता आमनेसामने आले आहे. तेव्हा दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप असा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. अशातच आपचे अरविंद केजरीवाल यांनी वोटिंग बूस्टिंगवरुन भाजपावर टीका केली होती. या टीकेला भाजपाचे नेते परवेश वर्मा यांनी उत्तर दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी 'भाजपा वोटिंग बूस्टिंगसाठी नवा पर्याय शोधला आहे. भारतीय जनता पक्ष देशभरातून लोकांना दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी लोकांचे स्थलांतर करत आहेत. यासाठी पक्षाचे नेते, खासदारांच्या घराच्या पत्त्याचा वापर केला जात आहे. भाजपाच्या परवेश शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी ३३ नवीन मतदार कसे तयार झाले? एका रात्रीमध्ये ३३ लोक परवेश शर्मा यांच्या घरी कसे काय पोहोचले?" असे म्हटले होते.

या आरोपावर पलटवार करताना परवेश वर्मा यांनी "मी आधी पश्चिम दिल्लीत खासदार होतो. तेव्हा मी, माझं कुटुंब, माझा स्टाफ असं सर्वाचं मतदान द्वारकामध्ये होत असे. आता पक्षाने नवी दिल्लीतून निवडणूक लढण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. तेव्हा मी मतदानाची जागा शिफ्ट केली. मी जेथे राहतो, तेथेच मतदान करतो." एएनआय पॉडकास्टमध्ये त्यांनी हे विधान केले.

परवेश वर्मा यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "काल अरविंद केजरीवाल एक पत्ता विसरले. तो पत्ता राहुल गांधींच्या घरचा पत्ता आहे. त्यांच्या घरातून २४ मत दिली जातात. त्यांचं तर लग्न सुद्धा व्हायचंय, त्यांना मुलंही नाही आहेत. माझं लग्न झालंय आणि मला मुलंबाळं सुद्धा आहेत. मी आता कुटुंबासह सर्व स्टाफच्या मतदानाची जागा शिफ्ट केली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT