PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या १५ वर्षीय मुलीला दिलासा, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान १५ वर्षीय मुलीने पीएम मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तिच्याविरोधात गुन्हहा दाखल करण्यात आला होता.

Priya More
  • दिल्ली पोलिसांकडून १५ वर्षीय मुलीला दिलासा

  • पीएम मोदींबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान

  • मुलीने सोशल मीडियावर माफी मागितल्याचा व्हिडीओ पोस्ट केला

  • त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्यावरील गुन्हा मागे घेतला

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुण-तरुणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका १५ वर्षीय मुलीचा देखील असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिने व्हिडीओमध्ये पीएम मोदींबाबत अनेक अपशब्द वापरले होते. या मुलीवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण आता दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा मागे घेतला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीने सार्वजनिकरित्या माफी मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तिने सांगितले की, तशा प्रकारची वक्तव्ये पुन्हा करण्यासाठी तिच्यावर प्रभाव टाकण्यात आला होता आणि या घटनेला तिने आपली पहिली आणि शेवटची चूक म्हटले आहे. या प्रकरणी, सुरुवातीला नोएडाच्या एक्स्प्रेसवे पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला होता. पण नंतर हे प्रकरण दिल्लीला वर्ग करण्यात आले, जिथे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली कारण ही कथित घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घडली होती.

पीडीत मुलीने स्वतःला १५ वर्षांची असल्याचे सांगितले. तिने सांगितले की, 'व्हायरल झालेली क्लिप तिने अपलोड केलेली नाही आणि तिला अत्यंत लाज वाटत आहे. 'मी जुलै महिन्यात माझ्या मित्रांसोबत कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आम्हाला तरुणांचा एक ग्रुप दिसला. जो पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरत होता. त्यांनी माझ्यावर प्रभाव टाकला आणि तेच शब्द पुन्हा उच्चारण्यासाठी मला प्रोत्साहन दिले, आणि मी तसे केले.

या मुलीने पुढे असे देखील सांगितले की, 'मी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. मी संपूर्ण देशाला आणि सर्वांना आवाहन करते की कृपया मला माफ करा. मी फक्त १५ वर्षांची आहे. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे, आणि मी असे कृत्य पुन्हा कधीही करणार नाही.' या मुलीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर नोएडामध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आलाी होती. त्यानंतर तिने माफी मागितली.

पीडित मुलगी सध्या तिच्या कुटुंबासोबत फरिदाबादमध्ये राहते. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते की, 'एक्स्प्रेसवे पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.' पुढील तपास दिल्ली पोलिस करत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT