दिल्ली पोलीस विभागातील २५ आयपीएस-डीएएनआयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. saam tv
देश विदेश

IPS Transfers : २५ आयपीएस, DANIPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; दिल्ली पोलिसांत मोठा फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

IPS officers transfer : दिल्ली पोलीस दलातील २५ आयपीएस आणि डीएएनआयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती केली, याची यादीही प्रशासनाने जाहीर केली आहे.

Saam Tv

दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल झाला आहे. एकाच वेळी तब्बल २५ आयपीएस आणि डीएएनआयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक अधिकाऱ्यांना नव्याने जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

दिल्ली पोलीस दलात झालेल्या फेरबदलामागे पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी करणे आणि विविध विभागांचे कामकाज अधिक उत्तम पद्धतीने चालवण्याचा उद्देश आहे. क्राइम ब्रँच, स्पेशल सेल, सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, अॅन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) आणि अनेक जिल्हा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणाची कुठे बदली आणि कुणावर सोपवला अतिरिक्त पदभार ?

मोनिका भारद्वाज या क्राइम ब्रँचच्या अॅडिशनल सीपी होत्या. त्यांची आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अॅडिशनल सीपी या पदावर नियुक्ती केली आहे.

राहुल मलिक हे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची सेक्युरिटी विभागाच्या अॅडिशनल सीपी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

गौरव शर्मा हे अधिकारी देखील नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची आता अतिरिक्त पोलीस आयुक्त (सेक्युरिटी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राजा बंथिया हे टेक्निकल आणि पीआयचे डीसीपी होते. आता त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. टेक्निकल आणि पीआयसह आयटीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

नेहा यादव यांच्यावर पूर्वी पीएमएमसी आणि एसपीयूडब्ल्यूएसीच्या डीसीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. आता त्यांची नियुक्ती पीएमएमसीच्या डीसीपी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण कुमार त्रिपाठी हे आधी स्पेशल सेलचे डीसीपी होते. आता सीपी सचिवालयात ते डीसीपी असतील.

सुबोध कुमार गोस्वामी हे आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी होते. आता डीपीएचे डेप्युटी डायरेक्टर असणार आहेत.

सौरभ चंद्रा हे द्वारका जिल्ह्याचे अॅडिशनल डीसीपी-२ होते. आता त्यांची वेस्ट जिल्ह्याच्या अॅडिशनल डीसीपी १ पदी बदली करण्यात आली आहे.

जसबीर सिंह हे याआधी साऊथ ईस्ट जिल्हा अॅडिशनल डीसीपी २ होते. त्यांची आऊटर जिल्ह्याच्या अॅडिशनल डीसीपी १ पदी नियुक्ती केली आहे.

आदित्य गौतम - आधी क्राईम ब्रँचचे एसीपी आणि आता क्राईम ब्रँचचे डीसीपी

डॉ. विकास श्योकंद - आधी नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत. आता नियुक्ती डीसीपी, स्पेशल सेल (सीडीसी).

ए. वेंकटेश - आधी नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता एडिशनल डीसीपी-२, शाहदरा जिल्हा (सीडीसी).

मनोज कुमार मीणा - आधी एडिशनल डीसीपी-I, आउटर जिल्हा (सीडीसी) आणि आता: एडिशनल डीसीपी-२, साउथ ईस्ट जिल्हा (सीडीसी)

विनय माथुर - आधी नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता रोहिणी जिल्हा (सीडीसी) एडिशनल डीसीपी-II या पदावर नियुक्ती

गुरसेवक सिंह - आधी नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता नॉर्थ जिल्हा (सीडीसी) येथे एडिशनल डीसीपी-२ नियुक्ती

अजय कुमार - एडिशनल डीसीपी-II, नॉर्थ-वेस्ट जिल्हा (सीडीसी) होते. त्यांची बदली आता डीसीपी, सुरक्षा (सीडीसी) येथे करण्यात आली आहे.

रीना लता - आधी एसीपी, एसपीयूडब्ल्यूएसी (SPUWAC). आता एडिशनल डीसीपी, एसपीयूडब्ल्यूएसी (सीडीसी).

विदुषी कौशिक - आधी: एसडीपीओ, सदर बाजार, नॉर्थ जिल्हा. आता एडिशनल डीसीपी-२, द्वारका जिल्हा (सीडीसी).

मनु हिमांशु - आधी एसीपी, डीई सेल आणि आता डीसीपी, डीई सेल (सीडीसी).

सकारिया मिहिर प्रवीणभाई - आधी एसीपी, ऑपरेशन्स, साउथ ईस्ट जिल्हा. आता: एडिशनल डीसीपी-२, आउटर जिल्हा (सीडीसी).

गरिमा तिवारी - आधी एसडीपीओ, तिलक नगर, वेस्ट जिल्हा. आता - डीसीपी, डीएसएफ, नवी दिल्ली जिल्हा (सीडीसी).

आशिष कुमार - आधी एसीपी, स्पेशल सेल आणि आता डीसीपी, ईओडब्ल्यू (EOW) (सीडीसी).

मनिष लाडला - आधी ते एसीपी, क्राईम ब्रँचला होते. आता डीसीपी, क्राईम (सीडीसी) येथे बदली झाली आहे.

रोहित गुप्ता - आधी एसीपी, सुरक्षा येथे नियुक्तीवर होते. आता त्यांची बदली डीसीपी, सुरक्षा (सीडीसी) करण्यात आली आहे.

राम दुलश मेणा - आधी एडिशनल डीसीपी-२, नॉर्थ जिल्हा या पदावर कार्यरत होते. आता एडिशनल डीसीपी-२, नॉर्थ-वेस्ट जिल्हा येथे बदली झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT