Delhi Police News Saam tv
देश विदेश

Delhi News : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; दोघांना अटक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा कारस्थानाला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी हे दोघे कार्यरत होते.

Shivaji Kale

Delhi News : 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी दोन संशयीतांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नौशाद आणि जगजीत सिंह असे या संशयीतांची नावे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा कारस्थानाला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी हे दोघे कार्यरत होते.

पोलिसांनी या संशयीत आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतलं असून न्यायालयाने या दोनही आरोपींना शुक्रवारी 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयीत दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर यांच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये पोलिसांना (Police) 3 पिस्तुल, हॅन्डग्रेड आणि 22 जिवंत काडतुसं मिळाली आहे.

दिल्ली (Delhi) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगजीत सिंह याचा खालिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध आहे. तर दुसरा आरोपी नौशाद देखील ‘हरकल अल अन्सार’ HUA या दहशतवादी गटाशी संबंध असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या दोनही आरोपींविरोधात युएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयीत दहशतवादी व्यक्तींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमची ही मोठी कारवाई केली आहे.

नौशादला दोन खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यासोबतच स्फोटक कायदा प्रकरणात नौशाद हा गेली 10 वर्षे तुरुंगात आहे. मात्र तो तुरुंगातून कसा बाहेर आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT