Lawrence Bishnoi Shooters 
देश विदेश

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ७ शूटर्सला अटक; पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई

Lawrence Bishnoi Shooters: दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलने मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शूटर्सला अटक केलीय. पंजाबसह इतर राज्यातून या शूटर्सला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

भारतभरात लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईत दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालंय.दिल्ली पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ७ शूटर्सला अटक केलीय. या सर्व शुटर्सच्या अटकेची कारवाई पंजाब आणि इतर राज्यात करण्यात आलीय. पोलिसांनी या आरोपींकडून अनेक हत्यारं जप्त केली आहेत.

याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई करण्यास सुरुवात केलीय. एनआयएने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षिष जाहीर केलंय. अनमोल बिश्नोई उर्फ भानु कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. तो गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे.

अनमोल बिश्नोईविरोधात १८ पेक्षा जास्त गुन्ह्यांच्या नोंद

वर्ष २०२३ मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरोधात चार्जशीट दाखल केली होती. वृत्तानुसार अनमोल बनवाट पासपोर्टद्वारे भारतातून पलायन केलं होतं. अनमोल बिश्नोई आपलं ठिकाण नेहमी बदलत असतो. मागील वर्षी त्याला केन्या आणि आता त्याला कॅनडामध्ये पाहण्यात आलं होतं. अनमोल बिश्नोईविरोधात १८ गुन्हे दाखल आहेत. तो जोधपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगवलीय. अनमोलला ७ ऑक्टोबर २०२१ ला जामीनावर सोडण्यात आलं होतं.

बाबा सिद्धीकीच्या हत्याप्रकरणात नाव आलं समोर

बाबा सिद्धिकीच्या हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईचं नाव समोर आले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. बाबा सिद्धिकी प्रकरणात अनमोल बिश्नोईचा सहभाग असल्याचं समोर आलंय. बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपांनी हत्या करण्याआधी अनमोल बिश्नोईशी स्नॅपचॅटवरून चर्चा केली होती. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्धिकीच्या हत्या प्रकरणाचा कट रचणारा प्रवीण लोनकरच्या संपर्कात होता. अनमोल कॅनाडाआणि अमेरिकापासून आरोपींच्या संपर्कात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT