Delhi Crime News Latest Update in Marathi File Photo SAAM TV
देश विदेश

धक्कादायक! डेटिंग अॅपवर ओळख, महिलेला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेलं अन्...

एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

साम ब्युरो

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबाद येथील एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या महिलेची डेटिंग अॅपच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. (Delhi Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार (Rape) झाला. पीडित महिलेने तसा आरोप केला आहे. दिल्लीतील द्वारका परिसरात ही धक्कादायक घटना घडली. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. डेटिंग अॅपद्वारे आरोपीशी ओळख झाल्याचे महिलेने आरोप करताना म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, ही घटना ३ जूनला घडली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरातील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला आहे. महिलेने तक्रारीतून तसा आरोप केला आहे.

डेटिंग अॅपच्या (Dating App) माध्यमातून महिला आणि आरोपीची ओळख झाली होती. आरोपी हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी हा फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्यक्ती ही हैदराबाद येथील रहिवासी आहे. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून आरोपी हा पीडित महिलेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आरोपीने तिला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या हॉटेलमध्येच आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Surat Bus Accident: सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT