PM modi Saam tv news
देश विदेश

Modi Poster news : ‘मोदी हटाओ देश बचाओ’ दिल्लीत जागोजागी बॅनरबाजी; ६ जणांना अटक तर १०० हून अधिक FIR दाखल

घटनेमागे एका राजकीय पक्षाचा हात असल्याचं म्हटलं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi : राजधानी दिल्ली येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असं लिहिलेले पोस्टर शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. हे पोस्टर आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. हे पोस्टर नेमके कोणी लावलेत याचा तपास पोलीस करत आहेत. (Political News)

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ६ जणांना ताब्यत घेतलं आहे. तसेच १०० हून अधिक एफआयआर नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी हे पोस्टर दिसत आहेत. कोणतेही पोस्टर बनवल्यानंतर त्यावर तेथील छापखान्याचा क्रमांक देण्यात येतो. मात्र या बॅनरवर असा कोणताही नंबर दिलेला नाही.

घटनेमागे एका राजकीय पक्षाचा हात

दीनदयाल मार्गावर पंतप्रधान मोदींचे पोस्टर लावल्याची माहिती पोलिसांना काल रात्री मिळाली. त्यानंतर त्यांनी ६ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या काही व्यक्तींनी पोलिसांना सांगितले की, एका राजकीय पक्षाने आम्हाला असे करण्यास सांगितले, असं वृत्त समोर येताच राजकीय वातावरण तापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT