Sanjay Singh Arrested Saam Tv
देश विदेश

Sanjay Singh News: 'आप' खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

Delhi Liquor Scam Case: आम आदमी पार्टीचे (AAP) नेते संजय सिंह यांना कोर्टाने पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.

Gangappa Pujari

Delhi Liquor Scam Case:

दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात सध्या अटकेत असलेले आम आदमी पार्टीचे (AAP) नेते संजय सिंह यांना कोर्टाने पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या संजय सिंग यांचा कोर्टातील मुक्काम वाढला असून त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) सध्या कथित दारू घोटाळ्यात सध्या अटकेत आहेत. ४ ऑक्टोंबर रोजी संजय सिंह यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली होती.

संजय सिंह दुसऱ्यांदा कोर्टात हजर झाले तेव्हा 13 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. आज पुन्हा या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायलयाने संजय सिंह यांना मोठा धक्का दिला असून २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, कोर्टातील मुक्काम वाढल्यानंतर संजय सिंह यांनी न्यायालयाकडे पुस्तकांची मागणी केली, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे. संजय सिंह यांनी तुरुंगात एकूण 15 पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्याची यादीही न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास मान्यता देत तुरुंग प्रशासनाला ही पुस्तके संजय सिंह यांच्याकडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT