Delhi liquor Scam Saamtv
देश विदेश

Delhi liquor Scam: दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात नवा ट्वीस्ट... CBI कडून ईडीच्या अधिकाऱ्याला अटक; प्रकरण काय?

Delhi Liquor Scam Case: दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने लाच घेणारा गट कार्यरत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

Gangappa Pujari

Delhi Scam: दिल्लीमधील दारु घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्यावर दारु घोटाळा प्रकरणातील आरोपीकडून पाच कोटींची लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला आहे. सीबीआयने (CBI) या प्रकरणी ईडीचे सहायक संचालक पवन खत्री, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या (ED) वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने लाच घेणारा गट कार्यरत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांना मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांच्या कथित पेमेंटप्रकरणी अटक केली आहे.

दरम्यान, दारु घोटाळा प्रकरणात याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजेरी केला असता न्यायालयाने सिसोदियांना नवीन बँक खाते उघडून पगार काढण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणी आता ईडीच्याच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने नवा ट्वीस्ट आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT