दिल्ली सरकारने खासगी कंपन्यांना दोन दिवस वर्क फ्रॉम होमची सूचना दिली.
इंधन बचतीसाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची शिफारस करण्यात आली.
सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंग वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
दिल्ली सरकारने इंधन बचतीसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व खाजगी कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस वर्क फ्रॉम होम सुरू करावे असा सूचना दिल्या आहेत. तसेच, कार्यालयाच्या वेळा विभागून घेण्याची शिफारस केली आहे. वेळ बदलली तर कर्मचाऱ्यांना कारपूलिंग करण्यास मदत होईल. यासह दिल्ली सरकारने सर्व नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. इंधनाची बचत करण्यासाठी हे उपाय आवश्यक असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे जगभरात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. भविष्यातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढत आहेत. सरकार त्यांचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असून जनतेलाही तसे करण्याचे आवाहन करत आहे.
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकारने विमान इंधनावरील व्हॅटमध्ये लक्षणीय कपात केली आहे. आधी जेट इंधनावर २५% टक्के व्हॅट आकारला जात होता. आता ते ७टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली विमानतळावर विमान इंधन भरण्यावरील महागाईचा काहीसा दिलासा मिळेल आणि भाडेदरही कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे एअरलाइन्स आणि कंपन्या आणि प्रवाशांना फायदा होईल, अशी आशा दिल्ली सरकारनं व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ऑनलाइन बैठकांची मालिका सुरू केली. सरकारी निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी ऑनलाइन बैठकांची मालिका सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी इंधन वाचवण्यासाठी 'माझा भारत, माझे योगदान' नावाची ९० दिवसांची मोहीम सुरू केली आहे. यातून ५० टक्के सरकारी बैठका ऑनलाइन घेतली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा संवर्धन, संसाधनांची बचत आणि जबाबदार जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, मुख्यमंत्री गुप्ता यांनी प्रशासकीय स्तरावर ऑनलाइन बैठका सुरू केल्या आहेत. गुप्ता यांनी सचिवालयात विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी (डीएम) आणि विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यांना सरकारच्या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.