Crime News saam tv
देश विदेश

Delhi Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

मुलीवर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

Shivaji Kale

Delhi Latest Crime News : दिल्लीत एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात घडली आहे.

तरुणी रक्ताच्या थारोळ्यात जंगलात सापडली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुकलीवर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रामनिवास पानिका आणि शक्तीमान सिंह अशी अटक (Arrest) केलेल्या आरोपांची नाव आहेत.

हे दोन्ही आरोपी विवाहित असून दोघेही एका कचरा पुनर्वापर कंपनीत सहाय्यक म्हणून काम करतात. ही धक्कादायक घटना काल शुक्रवारी (3 फेब्रुवारी) घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुलगी घरात न आढळल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिने त्या मुलीला वस्तीजवळील जंगलात पाहिले होते. महिलेने असेही सांगितले की तिने दोन पुरुषांना जंगलाच्या दिशेने जातानाही पाहिले होते.

महिलेकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जंगलात शोधाशोध केली असता तेथे मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला असला तरी आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी-चिंचवडमध्ये शर्मिला बाबर भाजपाच्या उप महापौरपदाच्या उमेदवार

Dogs Barking: रात्रीच्या वेळी कुत्री का भुंकतात? हे कारण वाचून बसेल धक्का

महाराष्ट्रातील प्रसिद्ध युट्युबर, इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोवर्स; ड्रग्ज तस्करी करताना रंगेहाथ सापडला

Sunetra Pawar: विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतला पहिला मोठा निर्णय

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर 'घातपात', आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा; महिला नेत्याची मागणी

SCROLL FOR NEXT