Tahir Hussain convicted in Delhi Dayalpur riots case saam tv
देश विदेश

दिल्ली दंगल प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; आपचे नेते ताहिर हुसेन दोषी, १२ आरोपींची निर्दोष मुक्तता

Delhi Riots Case: दिल्लीतील दयालपूर दंगल प्रकरणात आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांना न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणातील अन्य १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शिक्षेवरील युक्तिवाद १६ नोव्हेंबरला होणार आहे.

Bharat Jadhav

  • दिल्लीतील दयालपूर दंगल प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

  • माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांना दोषी ठरवण्यात आले.

  • भारतीय दंड संहितेच्या कलम १४७ आणि १०९ अंतर्गत दोषी ठरवल्याची माहिती.

दिल्लीतील दयालपूर भागात झालेल्या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांना दोषी ठरवण्यात आलंय. मात्र न्यायालयाने या प्रकरणातील इतर १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. करकरडूमा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचला यांनी हुसेन यांना भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १४७ (दंगल घडवणे) आणि कलम १०९ (गुन्ह्यास चिथावणी देणे) अन्वये दोषी ठरवलंय. शिक्षेच्या कालावधीबाबतच्या युक्तिवादासाठी न्यायालयाने १६ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केलीय.

ताहिर हुसेन यांची इतर आरोपांतून निर्दोष मुक्तता

या प्रकरणात ताहिर हुसेन, मोहम्मद शादाब, शाह आलम, रियासत अली, गुलफाम, रशीद, मोहम्मद रेहान, मोहम्मद आबिद, अर्शद कय्युम, इरशाद अहमद, दीपक सिंग सैनी, नवनीत आणि महक सिंग यांसह एकूण तेरा आरोपींचा समावेश होता. या आरोपींवर दंगल घडवून आणणे, घरात बळजबरीने प्रवेश करणे (हाऊसब्रेकिंग) आणि आग किंवा स्फोटक पदार्थांचा वापर करून नुकसान पोहोचवणे यांसारखे अनेक आरोप ठेवण्यात आले होते.

हुसेन यांना दंगल भडकवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. तरी न्यायालयाने त्यांची इतर आरोपांतून निर्दोष मुक्तता केलीय. या प्रकरणातील इतर १२ आरोपींची मात्र सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.

२०२० मध्ये दिल्लीतील दंगल

फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. यात ५३ जणांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या हिंसाचारानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. दंगलीशी संबंधित एका अन्य प्रकरणात, मार्च २०२३ मध्ये दिल्लीतील एका न्यायालयाने ताहिर हुसेन आणि इतर १० जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रामध्ये! मुंबईत महात्मा गांधींचे पणतू तर पुण्यातून 102 जण ताब्यात

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी वसलाय सुंदर बदामी तलाव, 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: पुण्यात लाल महाल चौकात आंदोलन करणाऱ्या 102 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

Navratri Horoscope: घटस्थापनेपासून ५ राशींचे नशीब चमकणार! देवीच्या कृपेने मिळणार शुभ संकेत

Egg Benefits: मेंदू, डोळे ते शरीरातील हाडं...; रोज २ उकडलेली अंडी खाल्ली तर कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT