UGC decision Saam Tvnews
देश विदेश

'युजीसी'चा मोठा निर्णय! आता देशातच मिळणार विदेशी विद्यापीठाची पदवी

युजीसीच्या निर्णयानुसार देशातील कोणतही विद्यापीठ आता जगातील कोणत्याही विद्यापीठाशी सलग्न अभ्यासक्रम सुरु करु शकते.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: बाहेरच्या देशात जावून शिक्षण (Education) घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. आता या विद्यार्थ्यांसाठी (Student) एक चांगली बातमी समोर आली आहे. आता त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशात जावून राहण्याची गरज नाही. आता असे विद्यार्थी देशातच राहून जगातील नावाजलेल्या विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतात. यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील कोणत्याही विद्यापीठ जगातील कोणत्याही सर्वोच्च विद्यापीठासोबत (University) सामायिक अभ्यासक्रम सुरू करू शकते.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२२-२३) भारतीय आणि विदेशातील संस्थांना संयुक्त पदवी, दुहेरी पदवी प्रोग्रॅम आणि ट्विन प्रोग्रॅम साठी परवानगी दिली आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी मंगळवारी भारतीय आणि विदेशी संस्थांचे एकत्रित पदवी प्रोग्रॅम सुरू करण्याची घोषणा केली. या संदर्भात या आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे देखील पाहा

भारत सरकारने जाहीर केलेल्या एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमधील टॉप १०० आणि जागतिक रॅकिंगमध्ये असलेल्या १००० जागतिक संस्थांचा या पदवी प्रोग्रॅममध्ये सहभाग असू शकतो.

यूजीसीने (UGC) सांगीतले की, संयुक्त पदवी प्रोग्रॅमचे नियम बनवण्यापूर्वी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात आले होते. या प्रोग्रॅममध्ये भारतीय विद्यार्थ्यांना (Students) विदेशी संस्थांकडून क्रेडिट घेण्याची परवानगी दिली जाईल. हे क्रेडिट विदेशी संस्थेकडून ३० टक्क्यांपर्यंत घेतले जाऊ शकते. दुसरीकडे, विदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय विद्यापीठाकडून ३० टक्के क्रेडिट मिळू शकेल. या अंतर्गत भारतीय उच्च शिक्षण संस्था ही पदवी देणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना १ ते २ सेमिस्टरसाठी विदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर विदेशी संस्थांचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

युजीसीच्या (UGC) अहवालानुसार, ही व्यवस्था ऑनलाइन पदवी प्रोग्रॅम आणि डिस्टंस आधारीत पदवी प्रोग्रॅममध्ये लागू होणार नाही. विदेशी पदवी अभ्यासक्रमांचा हा अभ्यास रेग्युलर क्लासरुम प्रमाणे होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला या तिन्ही कार्यक्रमांच्या आधारे विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधीही मिळणार आहे. या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये वैद्यकीय, कायदे, आणि कृषी पदवींचा या प्रोग्रॅममध्ये समावेश केला जाणार नाही.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT