air marshal vivek ram chaudhari  
देश विदेश

देशाच्या वायुदल प्रमुखपदी महाराष्ट्राचे विवेक चौधरी

वृत्तसंस्था

सातारा : एअर मार्शल विवेक राम चौधरी air marshal vivek ram chaudhari हे देशाच्या वायुदल दलाचे प्रमुख म्हणून लवकरच कार्यभार स्विकारणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने defence ministry चाैधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. श्री. चौधरी हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत.

श्री. चौधरी हे देशातील २७ वे वायुदल प्रमुख असतील. यापूर्वी त्यांनी एक जुलै रोजी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. २९ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत सहभागी झाले हाेते. एअर मार्शल चौधरी सध्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी मिग २९ स्क्वाड्रनचे नेतृत्व केले आहे. त्यांना एसयू ३० एमकेआयसह विविध प्रकारच्या विमानांचा अनुभव आहे.

हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया हे ३० सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर व्हीआर चौधरी हे आपला पदभार स्विकारतील. त्यांच्या निवडीने नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

Cash Rule: घरात २० हजारांची कॅश ठेवताय तर कारवाई होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT