Utpal Parrikar Saam TV
देश विदेश

Goa Assembly Election Result: गोव्यात उत्पल पर्रिकरांना धक्का, इतक्या मतांनी पराभव

मी लढतीवर समाधानी आहे, मात्र निकालामुळे थोडा निराश असल्याचं पर्रिकर म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पणजी : गोव्यात (Goa Election) सर्वाधिक चर्चेत असणारी जागा म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची (Utpal Parrikar) कारण पर्रिकर यांना भाजपने पणजी मतदार संघामधून उमेदवारी नाकारली होती आणि भाजपने या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना तिकीट दिले होते. त्यामुळे याच जागेवरुन भाजप आणि उत्पल पर्रिकर यांच्यामधील संघर्ष समोर आला होता.

नाराज उत्पल यांनी आपला अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालानुसार उत्पल पर्रीकर याचा ७१३ मतांनी पराभव झाला आहे. तर दुसरीकडे भाजपला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. उत्पल यांनी भाजप उमेदवारावर अनेक आरोप केले होते तसंच या जागेवरती दिवंगत मनोहर पर्रीकर दीर्घकाळ आमदार होते त्यामुळे ती जागा मला मिळावी असा दावा केला होता.

दरम्यान 'मी लढतीवर समाधानी आहे, मात्र निकालामुळे थोडा निराश असल्याचं पर्रिकर म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT