A tragic reminder of how dangerous online games can turn fatal for children Saam Tv
देश विदेश

'कोरियन लव्ह गेम'चा जीवघेणा विळखा, तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

Online Game Turns Fatal: पालकांनो, सावधान व्हा... तुमच्या मुलाला ऑनलाईन गेम खेळायला आवडतो... मग ही बातमी तुमच्यासाठी आहे... लहान मुलांमध्ये लोकप्रिय असणारा एक गेम त्यांच्याच जीवावर कसा उठलाय.. तीन बहिणींनी नेमकं असं काय केलं? ज्य़ामुळे संपूर्ण देश हादरलाय...

Omkar Sonawane

ज्या डोळ्यांनी भविष्याची स्वप्नं पाहायची, ज्या हातांनी बाहुल्यांशी खेळायचं, त्याच हातांतील मोबाईलनं तीन सख्ख्या बहिणींचा जीव घेतलाय... एका हसत्या-खेळत्या घराची राखरांगोळी झालीय... एका रात्रीत, एका क्षणात, तीन सख्ख्या बहिणी कायमच्या निघून गेल्या... आणि त्याला कारण ठरलाय...' कोरियन लव्ह गेम'...

"सॉरी पापा... आम्ही कोरिया सोडू शकत नाही. कोरिया हेच आमचे जीवन आहे आणि तुम्ही आम्हाला तिथून बाहेर काढू शकत नाही, म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत." असं पत्र लिहून घरातील तिन्ही मुलींनी एकमेकींचे हात पकडून इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. काय आहे हा जीवघेणा कोरियन लव्ह गेम ...

जीवघेणा कोरियन लव्ह गेम

हा फक्त मनोरंजनाचा खेळ नसून एक टास्क बेस्ड रोमँटिक गेम

गेममध्ये एक कोरियन व्हर्च्युअल पार्टनर निवडून चॅटिंग करता येते

ब्लू व्हेल गेमप्रमाणेच यात 50 दिवसांचे 50 टास्क दिले जातात

सुरुवातीला चॅटिंग, फोटो शेअर असे साधे टास्क पुढे धोकादायक होत जातात

हा गेम K-Pop आणि K-Drama च्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतो

मुलांना आपण एका काल्पनिक कोरियन जगात असल्याचा भास होतो

कोरियन लव्हमधील शेवटचे टास्क खेळाडूला मृत्यूच्या दारात ढकलणारे असतात

कोरोनापासूनच या मुलींना मोबाईलचं व्यसन लागलं होतं...त्यापायी त्यांनी शाळेत जाणंही बंद केलं... पालक त्यांना अभ्यासावरून आणि गेमिंगवरून सुनावयचे..त्याच रागातून या सख्ख्या बहिणींनी हे पाऊल उचललंय..

त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना सावधान रहा..मुलांशी संवाद साधा, पुस्तक वाचनाची, मैदानावरील खेळाची आवड मुलांमध्ये निर्माण करा... कारण गेम 'ओव्हर' झाला की रिस्टार्ट करता येतो, पण आयुष्य नाही!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT