Ayodhya Blast Saam tv
देश विदेश

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

ayodhya blast News update : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

अयोध्येत सिलिंडरचा स्फोट होऊन घर कोसळलं

या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, काही जखमी

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु

अयोध्याच्या ग्रामीण भागात पूराकलंदारमध्ये सिलिंडर स्फोटानंतर घर कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अयोध्येतील पगला भारी या गावात ही घटना घडली आहे. दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घर कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या घर आणि दुकानांचही मोठं नुकसान झाली आहे. बचाव पथक ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचं काम करत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे काढण्याचं काम सुरु आहे.

पोलीस अधिकारी सुजीत पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या येथील घडलेली घटना प्राथमिक माहितीनुसार, फटाके किंवा स्फोटामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. घरातील कुकर किंवा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घटना घडली आहे. घटनास्थळी स्फोटाशी संबंधित कोणत्याही वस्तू आढळल्या नाहीत. आता घटनास्थळी बीडीएस आणि एफएसएलची पथक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT