LPG Cylinder Blast Saam tv marathi
देश विदेश

Cylinder Blast : जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, ३ घरं कोसळली, लहान मुलासह चौघांचा मृत्यू

LPG Cylinder Explosion : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटात तीन घरे कोसळली असून चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Cylinder Blast Death Toll : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका घरात जेवण बनवताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा स्फोट इतका तीव्र भयंकर होता की, बाजूची ३ घरेही जमिनीदोस्त झाली. या दुर्दैवी अपघातात एका चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे.

सोमवारी संध्याकाळी घरात जेवण बनवताना अचानाक गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण आणि तीव्र होता की, परिसरात मोठा आवाज झालाच. पण बाजूची ३ घरेही जमिनीदोस्त झाली. या दुर्घटनेत चिमुकल्यासह चार जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरूच होती. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणमध्ये राहणारे सुरेश गुप्ता घरात स्वयंपाक करत होते. त्यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की, सुरेश यांच्या घरासोबतच शेजारी असलेली आणखी दोन घरे पूर्णपणे कोसळली. या अचानक झालेल्या दुर्घटनेने परिसरात मोठी घबराट आणि पळापळ झाली.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान एका लहान बाळासह चौघांनी प्राण गमवाले. उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

LPG सिलिंडर आता लोनवर, कोणतेही व्याज नाही; फक्त महिना ₹१०० मोजावे लागणार, योजनेचा कसा घ्यावा लाभ?

5 Breakfast Recipe: 5 मिनिटांत बनवा 5 झटपट आणि चविष्ट नाश्त्याचे प्रकार

Sharad Pawar: पवारांचं टायमिंग कुणालाच कळत नाही; शरद पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया व्हायरल

SCROLL FOR NEXT