The cruelty of Russian soldiers; mounted Army Tank on Ukrainian old citizens - Watch the video Twitter/@grantstern
देश विदेश

Ukraine-Russia Crisis: क्रुरतेचा कळस; रशियन सैनिकांनी वयोवृद्धाच्या कारवर चढवला रणगाडा (पहा Video)

Ukraine-Russia Crisis: रशियन सैन्याने चक्क एका युक्रेनीअन वयोवृद्ध नागरिकाच्या कारवर चक्क रणगाडाच (Army Tank) चढवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ukraine-Russia Crisis: रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia - Ukraine War) केल्यानंतर आता रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत (Kyiv) पोहोचलंय. रशियन सैन्याच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे शेकडो निष्पाप नागरिक मारले गेले असून सार्वजनिक मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रशियाचे सैनिकही (Russian Soldier) कुणालाही मारण्यास मागे-पुढे पाहत नाही. अशातच रशियन (Russia) सैन्याच्या क्रुरतेचा (Cruelty) आणखीन एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यात रशियन सैन्याने चक्क एका युक्रेनीअन वयोवृद्ध नागरिकाच्या कारवर चक्क रणगाडाच (Army Tank) चढवला आहे. ही कार रणगाड्याखाली अक्षरश: दाबली गेली, ज्यामुळे तो वयोवृद्द जखमी झाला आहे. (The cruelty of Russian soldiers; mounted Army Tank on Ukrainian old citizens - Watch the video)

हे देखील पहा -

रणगाडा कारवर चढवल्याने कारचा चुराडा झाला असून तो वयोवृद्ध युक्रेनियन (Ukraine) नागरिक कारमध्येच अडकला, नंतर स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नांतून त्याला बाहेर काढले. रणगाडा चढवण्यात आला तो वयोवृद्ध व्यक्ती यात थोडक्यात बचावला, त्याचे प्राण वाचले पण तो गंभीर जखमी झाला. माथेफिरु रशियन सैनिकाने थेट कारवर रणगाडा चढवल्याच्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून रशियन सैनिकांच्या या क्रुर कृत्याबद्दल जगभरातून संताप व्यक्त केला जातोय.

युक्रेनला रशियन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की सतत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशीही चर्चा केली आहे. व्हाईट हाऊसने संभाषणाची पुष्टी केली आहे आणि सांगितले की ते सुमारे 30 मिनिटे चालले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि जो बायडेन यांच्यात 30 मिनिटे झालेल्या चर्चेत निर्बंध आणि संरक्षण मदत यावर चर्चा झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT