Madhya Pradesh Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : बायकोला मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Madhya Pradesh Crime News : बायकोला मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघून तरुणाला संताप अनावर झाला. त्याने स्टोअर रुममध्ये जाऊन कुऱ्हाड आणली आणि दोघांनाही संपवलं. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या दतिया जिल्ह्यात घडली

Satish Daud

बायकोला मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघून तरुणाला संताप अनावर झाला. त्याने स्टोअर रुममध्ये जाऊन कुऱ्हाड आणली. दोघांनाही काही कळण्याच्या आतच तरुणाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेनंतर महिलेसह तिच्या बॉयफ्रेंडचा जागीच मृत्यू झाला.

या हत्याकांडानंतर तरुण स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून महिलेसह तिच्या प्रियकराचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा तरुण स्वत:च्या गुन्ह्याची कबुली द्याला पोलीस ठाण्यात आला. तेव्हा पोलिसांना त्याच्यावर विश्वासच बसला नाही.

मात्र, त्याच्यासोबत असलेली कुऱ्हाड रक्ताने माखलेली पाहून पोलिसांना खात्री पटली. पोलिसांनी घटनेबाबत तरुणाला विचारले असता, त्याने संपूर्ण घटनाक्रमच उलगडून सांगितला. आरोपी तरुण म्हणाला, "मी सिव्हिल लाईन परिसरातील बाग गावचा रहिवासी असून वर्षभरापूर्वी माझे लग्न मृत पूजा हिच्यासोबत झाले होते".

"लग्नानंतर आम्ही दोघेही खूश होतो. पण तिचे एका तरुणासोबत प्रेम जडले होते. या तरुणाने माझ्यासोबत मैत्री केली. अधून मधून तो आमच्या घरी यायचा मला सुरुवातीला शंका आली पण बायकोचा नातेवाईक म्हणून मी याकडे दुर्लक्ष केले".

"पण त्या तरुणाचे आमच्या घरी येणे खूपच वाढले. गेल्या ६ महिन्यांपासून तो सातत्याने माझ्या घरी यायचा. अनेकवेळा तो माझ्या पाठीमागेही घरी येऊन जायचा. पण पत्नी माझ्यापासून ही गोष्ट लपवत होती. मला शेजाऱ्यांनीच या गोष्टीबाबत सांगितले. त्यामुळे मी दोघांवरही लक्ष ठेवण्यास सुरुवात केली".

"कामाचा बहाणा करून मी बाहेरगावी जातो, असं सांगून घराबाहेर पडलो. त्यानंतर पत्नीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. मी अचानक घरी आलो असता, दरवाजा आतून बंद होता. गच्चीवरून उडी मारून मी घरात गेलो असता, मला माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत बेडवर नको त्या अवस्थेत आढळली. यानंतर माझा संताप अनावर झाला आणि दोघांनाही मी त्याच अवस्थेत कुऱ्हाडीने वार करून संपवलं".

तरुणाने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते. त्यांनी तातडीने त्याला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी मृत महिला आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT